झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकून देण्यात भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहर याचा मोठा वाटा राहिला. चाहरने ६ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत धडाकेबाज प्रदर्शन करत सामनावीर पुरस्कारही पटकावला. त्याने आपल्या प्रदर्शनाने फक्त भारतीय क्रिकेट चाहत्यांचीच नव्हे तर झिम्बाब्वेच्या चाहत्यांचीही मने जिंकली आहे. चाहरचा झिम्बाब्वेच्या महिला चाहतींसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चाहरने (Deepak Chahar) झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe vs India) पहिल्या वनडे सामन्यात ७ षटके फेकली. यादरम्यान त्याने फक्त २७ धावा खर्च केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. त्याने ३.९० च्या इकोनॉमीने या विकेट्स घेतल्या. त्याच्या या प्रदर्शनामुळे भारतीय संघ झिम्बाब्वेला ४०.३ षटकातच १८९ धावांवर रोखू शकला.
त्याच्या या प्रदर्शनाने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सामना पाहायला आलेल्या झिम्बाब्वेच्या काही महिला चाहत्या (Zimbabwe Female Fans) चांगल्याच प्रभावित झाल्या. त्यांनी सामना संपल्यानंतर चाहरसोबत फोटो काढण्यासाठी बरीच प्रतिक्षा केली. चाहरनेही त्यांना नाराज केले नाही. त्यानेही झिम्बाब्वेच्या महिला चाहतींशेजारी उभे राहून फोटो काढले.
झिम्बाब्वेच्या एका चाहतीने सुरुवातीला चाहरकडे जात त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. यावर चाहरने लगेचच होकारार्थी मान हालवली. त्यानंतर त्या चाहतीने मजेत चाहरच्या खांद्यावर फोटो काढण्याची परवानगी मागितली. ज्यावरही चाहरने होकार दिल्याने ती फारच खुश झाली आणि आनंदात फोटो काढून घेतले. त्या चाहतीपाठोपाठ आणखी दोघींनी चाहरसोबत फोटो काढून घेतले. यावेळी चाहरच्या वर्तनावर झिम्बाब्वेच्या महिला चाहत्या नक्कीच बोल्ड झाल्या.
एका पत्रकाराने हा प्रसंग कॅमेरात टिपला असून सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. तसेच त्या पत्रकाराने झिम्बाब्वेच्या त्या महिला चाहतींना चाहरबद्दल प्रश्नही विचारले. ज्यावर त्यांनी उत्तरे देत ‘चाहर चांगल्या मनाचा व्यक्ती’ असल्याचे म्हटले. तसेच एका चाहतीने त्याला ‘क्यूट’ असेही म्हटले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या वर्ल्डकप विजयाचा नायक करतोय पुनरागमन! स्वत:च चाहत्यांना दिली खूशखबर
आशिया कपसाठी बांगलादेशची जबाबदारी ‘श्रीराम’च्या खांद्यावर; वाचा सविस्तर वृत्त
दे घुमा के! पाच सिक्स अन् सहा फोर, आंद्रे रसेलने फक्त ११ चेंडूत ठोकले अर्धशतक