भारतीय संघाने गुरुवारी (१८ ऑगस्ट) झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या धडाकेबाज विजयात सलामीवीर शिखर धवन आणि शुबमन गिल यांच्याबरोबरच वेगवान गोलंदाज दीपक चाहर याचाही मोलाचा वाटा राहिला. दुखापतीनंतर ६ महिन्यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असलेल्या चाहरने कौतुकास्पद प्रदर्शन करत सामनावीर पुरस्कार पटकावला.
या मॅच विनिंग प्रदर्शनानंतर चाहरने (Deepak Chahar) त्याच्या योजनेचा खुलासा केला आहे. तसेच टी२० विश्वचषक २०२२ मध्ये (T20 World Cup 2022) खेळण्याच्या आपल्या संधींबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
चाहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ७ षटके फेकली. यादरम्यान त्याने फक्त २७ धावा खर्च केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. त्याने ३.९० च्या इकोनॉमीने या विकेट्स घेतल्या.
पुनरागमनाच्या सामन्यात कोणत्या योजनेसह उतरला होता राहुल
सामन्यानंतर आपल्या प्रदर्शनाबाबत बोलताना चाहर म्हणाला की, “मला वाटते की, मी तिथूनच सुरुवात केली आहे, जिथे मी सोडले होते. आजही मी पहिली २ षटके सोडून चांगली गोलंदाजी केली. मी एकत्र ७ षटके गोलंदाजी केली. जे दर्शवते की माझ्या फिटनेसचा स्तर आता ठीक आहे. या सामन्यात माझी योजना सामान्य होती. जर चेंडू स्विंग होत असेल तर फुल लेंथ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायचा आणि विकेट्स घ्यायच्या. जर चेंडू स्विंग होत नसेल तर माझ्याकडे बी आणि सी अशा २ योजना होत्या.”
“आज गोलंदाजी करताना माझ्या सातव्या षटकापर्यंत चेंडू स्विंग होत होता. त्यामुळे साहजिक होते, मी फुल लेंथ गोलंदाजी करणार होतो आणि स्विंगचे मिश्रण करत फलंदाजांना गोंधळात टाकणार होतो”, असेही चाहरने म्हटले.
टी२० विश्वचषकात खेळण्याबाबत चाहरने दिलेली प्रतिक्रिया
तसेच चाहरला विचारले गेले की, झिम्बाब्वेविरुद्धच्या उल्लेखनीय प्रदर्शनानंतर टी२० विश्वचषकासाठी (Deepak Chahar On T20 World Cup) त्याच्यासाठी भारतीय संघाची दारे खुली होऊ शकतात का. यावर बोलताना चाहर म्हणाला की, “मी हे नाही सांगू शकत की, माझी निवड केली जाईल की नाही?. कारण या गोष्टी माझ्या हातात नाहीत. परंतु कौशल्याबाबत बोलायचे झाल्यास, मी कठोर मेहनत केली आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रगीत सुरू असताना भर मैदानात इशान किशनवर ‘हल्ला’! खूप घाबरला भारतीय क्रिकेटर
संतापजनक! १८ वर्षीय बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध दर्शवल्याने २५ फूटावरून दिले ढकलून
हरवल झिम्बाब्वेला, घाव पाकिस्तानच्या जिव्हारी! एकाच विजयासह टीम इंडियाचा ‘डबलवार’