---Advertisement---

संतापजनक! १८ वर्षीय बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध दर्शवल्याने २५ फूटावरून दिले ढकलून

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 9:01 AM
---Advertisement---

क्रिडाविश्वातून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. एका १८ वर्षीय बास्केटबॉलपटूवर ३ तरुणांनी मिळून बलात्काराचा प्रयत्न केला असून तिने विरोध केल्यामुळे तिला स्टेडियमच्या छतावरून खाली फेकून दिले आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यामुळे किशोरवयीन बास्केटबॉलपटूला गंभीर दुखापत झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यानंतर तिला लुधियानातील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

शुक्रवारी (१२ ऑगस्ट) ही घटना घडली आणि त्यानंतर हे तीनही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलीच्या वडिलांनी त्वरित पोलिसांकडे धाव घेतली आहे. वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुलगी सरावासाठी मोंगा येथील स्टेडियमवर गेली होती.  ३ आरोपींपैकी एक, जतीन कंदा नावाच्या आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

जेव्हा तिने प्रतिकार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिला सुमारे २५ फूट उंच स्टेडियमच्या छतावरून खाली ढकलले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या पायाला आणि जबड्याला जबर मार लागला आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1560212702621945857?s=20&t=4bwMoN5aF04QoLo1zafl5g

या प्रकरणी आरोपी जतीन आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध मोगा येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ३७६ (बलात्कार) सह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोगाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुलनीत खुराना यांनी गुरुवारी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

पत्नी धनश्रीला घटस्फोट देण्याच्या अफवांवर स्पष्टच बोलला चहल; म्हणाला, ‘आमच्या नात्यात दुरावा…’

आजच्याच दिवशी २२ वर्षांपूर्वी रंगलेला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना

पाकिस्तानचा इतिहास सांगतो आऊटऑफ फॉर्म असणारा खेळाडू परततोच! विराटबाबत मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---