---Advertisement---

पत्नी धनश्रीला घटस्फोट देण्याच्या अफवांवर स्पष्टच बोलला चहल; म्हणाला, ‘आमच्या नात्यात दुरावा…’

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 8:28 AM
Yuzvendra-Chahal-Dhanashree-Verma
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. यानंतर आता तो थेट आशिया चषक २०२२मध्ये दिसणार आहे. तो क्रिकेटमध्ये नसला तरी सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेयर केली आहे. त्याचबरोबर त्याची पत्नी धनश्रीनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही बदल केले आहेत. त्यावरून त्यांच्या नातेसंबंधात दरार आल्याच्या चर्चेला उधान आले आहे. मात्र आता स्वत: चहल आणि धनश्रीने या अफवांवर पूर्णविराम लावला आहे.

चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा हिने तिचे इंस्टाग्रामवर नाव बदलले आहे. ती आधी धनश्री वर्मा चहल असे लिहीत होती, मात्र आता तिने धनश्री वर्मा असे लिहिले आहे. याच बदलानंतर युझवेंद्रने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेयर करत त्यात ‘न्यू लाईफ लोडिंग’, असे लिहिले होते.

दोघांच्याही इंस्टाग्राम अकांउटवर झालेल्या या बदलामुळे आणि अपडेटमुळे सोशल मीडियावर नाना प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये काही जणांनी दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसले आहे, असे आपले तर्कवितर्क लावले आहेत. परंतु आता चहल आणि धनश्री दोघांनीही पोस्ट शेअर करत त्यांच्यात सर्वकाही अलबेल असून त्यांच्या नात्यात कसलाही दुरावा आलेला नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

Yuzvendra Chahal Insta Story
Photo Courtesy: Instagram/ Screengrab

धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, आमच्या नात्याबद्दल कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपा करून अशा अफवा पसरवणे बंद करा. सर्वांना प्रेम आणि शुभेच्छा.’ चहलनेही अशीच इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, चहल आणि धनश्रीच्या नात्यात कसलीही फूट पडलेली नाही.

लॉकडाऊनमध्ये झाले लग्न
कोरोनामुळे भारतात जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला त्यादरम्यान युझवेंद्र आणि धनश्री यांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी २०२०मध्ये लग्न करत चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे कळवले. धनश्री ही एक कोरियोग्राफर असून ती नेहमी तिच्या डान्सच्या व्हिडिओने चर्चेत असते.

महत्त्वाच्या बातम्या-

आजच्याच दिवशी २२ वर्षांपूर्वी रंगलेला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना

‘लॉर्ड्स’चा लॉर्ड बनला ब्रॉड! ‘ती’ आगळीवेगळी कामगिरी करणारा अँडरसननंतर केवळ दुसराच गोलंदाज

अस्पायरची स्वप्नवत सुरवात! महिला फुटबॉल लीग पात्रता फेरीत लॉलेस युनायटेडवर सहज विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---