भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. यानंतर आता तो थेट एशिया कपमध्ये दिसणार आहे. तो क्रिकेटमध्ये नसला तरी सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेयर केली आहे. त्याचबरोबर त्याची पत्नी धनश्रीनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही बदल केले आहेत. त्यावरून त्यांच्या नातेसंबंधाच्या चर्चेला उधान आले आहे.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा हिने तिचे इंस्टाग्रामवर नाव बदलले आहे. ती आधी धनश्री वर्मा चहल असे लिहीत होती, मात्र आता तिने धनश्री वर्मा असे लिहिले आहे. याच बदलानंतर युझवेंद्रने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेयर करत त्यात ‘न्यू लाईफ लोडिंग’, असे लिहिले आहे.

दोघांच्याही इंस्टाग्राम अकांउटवर झालेल्या या बदलामुळे आणि अपडेटमुळे सोशल मीडियावर नाना प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये काही जणांनी दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसले आहे, असे आपले तर्कवितर्क लावले आहेत.

चाहत्यांच्या या चर्चेवर युझवेंद्रने त्याचे मत मांडत पुन्हा एकदा इंस्टाग्रामला स्टोरी पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.

लॉकडाउनमध्ये लग्न करत चाहत्यांना केलं होतं चकीत
कोरोनामुळे भारतात जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला त्यादरम्यान युझवेंद्र आणि धनश्री यांचे काही फोटो व्हायरल होत होते. नंतर दोघांनी २०२०मध्ये लग्न करत चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे कळवले. धनश्री ही एक कोरियोग्राफर असून ती नेहमी तिच्या डान्सच्या व्हिडिओने चर्चेत असते.
एशिया कपमध्ये परतणार युझवेंद्र
भारताच्या या प्रमुख आणि स्टार खेळाडूने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तर युझवेंद्र हा एशिया कपमध्ये खेळणार आहे.
युझवेंद्रने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकिर्द २०१६मध्ये सुरू केली. त्याने ६७ वनडेमध्ये ११८ विकेट्स आणि ६२ टी२०मध्ये ७९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३१ सामन्यांत १६६ विकेट्स घेतल्या आहेत. सध्या तो राजस्थान रॉयल्स संघात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच
थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श
सोलापूरचा महेंद्र पुन्हा चमकला! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पठ्ठ्याने मारले सिल्वर






