---Advertisement---

‘दीपक चाहरचे पुनरागमन सोपे नसेल’ माजी दिग्गजाने केली भविष्यवाणी

---Advertisement---

भारतीय संघ आता ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वे विरुद्ध खेळेल. ही मालिका गुरुवार, १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आगामी आशिया चषक २०२२च्या पार्श्वभूमीवर बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, पुनरागमन करणारा स्टार भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि स्टार फलंदाज केएल राहुल यांच्यावर नजर असेल. भारताचा माजी फिरकीपटू मनिंदर सिंग याने या मालिकेबद्दल आपले मत व्यक्त केले आणि सांगितले की, दीपकला पुनरागमन करणे सोपे नाही.

तीस वर्षीय दीपक चहर फेब्रुवारीमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. तो आयपीएलच्या शेवटच्या हंगामातही खेळला नव्हता. फेब्रुवारीनंतर तो प्रथमच झिम्बाब्वे मालिकेतच दिसणार आहे. क्रिकेटपटूतून समालोचक झालेले मनिंदर सिंग म्हणाले की, “चहरचे दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणे सोपे नसेल.”

त्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, “दुखापतीमुळे दीर्घ विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे सोपे होणार नाही. संघ व्यवस्थापनाला या स्विंग गोलंदाजाची काळजी घ्यावी लागणार आहे. बराच काळ ब्रेक झाला असून तो (दीपक चहर) दुखावला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे इतके सोपे नाही, जिथे तुम्हाला दुखापतीमुळे इतका मोठा ब्रेक मिळाला आहे.” मनिंदर पुढे म्हणाला की, “सुरुवातीसाठी त्याला काळजीपूर्वक हाताळावे लागेल, परंतु मला खात्री आहे की संघ व्यवस्थापनाला त्याचा कधी वापर करायचा आणि कधी नाही हे समजेल. तो प्रतिभावान खेळाडू आहे.”

दरम्यान, दीपक चहरने आतापर्यंत ७ वनडे आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत तर टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये २६ विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

धोनीचा सिक्स अन् भारतानं जिंकला पहिला टी-२० आशिया कप, रोहितही अशाच कामगिरीसाठी उत्सुक

‘बाबरचे वादळ रोखणं होतंय कठीण!’ मागील ८ पैकी ७ सामन्यात झळकावलंय अर्धशतक, वाचा रेकॉर्ड्स

अल्टीमेट खो-खो स्पर्धेत आदर्श मोहितेची चमकदार कामगिरी, तेलगु योद्धाज संघांचा सलग दुसरा विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---