भारतीय संघाने मंगळवारी (२८ जून) आयर्लंडविरुद्धची टी-२० मालिका नावावर केली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला, तर दुसरा सामन्या अवघ्या ४ धावांनी भारत विजयी झाला. दुसऱ्या सामन्यात मिळवलेल्या विजयात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांचे सर्वात महत्वाचे योगदान राहिले. या दोघांमध्ये विक्रम भागीदारीही झाली.
सलामीवीर इशान किशन या सामन्यात अवघ्या तीन धावा करून बाद झाला. पहिली विकेट स्वस्तात पडल्यानंतर दीपक हुड्डा () आणि संजू सॅमसन () यांनी भारतीय संघाला भारताचा डाव सांभाळला. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांमध्ये तब्बल १७६ धावांची भागीदारी पार पडली. भारतीय संघाच्या इतिहासात ही टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी ही कामगिरी रोहित शर्मा () आणि केएल राहुल () यांच्या नावावर होती. त्यांनी २०१७ साली श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात हा विक्रम केला होता. या सामन्यात त्यांनी मिळून १६५ धावाची भागीदारी केली होती. आता सॅमसन आणि हुड्डा जोडीने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
दरम्यान, उभय संखातील या सामन्याचा विचार केला, तर सॅमसनने ४२ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. तर दुसरीकडे हुड्डाने अवघ्या ५७ चेंडूत १०४ धावा केल्या, ज्यामध्ये ९ चौकार आणि ६ षटकरांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ९ वी सर्वात मोठी भागीदारीही आथा सॅमसन आणि हुड्डाच्या नावार झाली आहे.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. सॅमसन आणि हुड्डाच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर संघाने २० षटकांमध्ये २२५ धावा केल्या. आयर्लंडविरुद्ध एखाद्या संघाने केलेली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. या बाबतीत स्कॉटलँड पहिल्या क्रमांकावर आहे, ज्यांनी आयर्लंडविरुद्धच्या एका टी-२० सामन्यात २५२ धावा केल्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा आयर्लंडचे फळंदाज खेळपट्टीवर आले, तेव्हा तांनी चांगली सुरुवा केली. आयर्लंडच्या फलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत खिंड लढवली, पण अखेर भारताने ४ धारा शिल्लक ठेवून विजय मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचं ठरलंय! अशी असेल इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारताची ‘प्लेइंग ११’
एवढं सगळ करूनही संजू सॅमसनवर भारतीय दिग्गज नाराजच! वाचा काय म्हणतोय
दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनच्या वादळाने उध्वस्त केले सारेच विक्रम, नावावर केला टी२०तील वर्ल्ड रेकॉर्ड