आयपीएल 2024 मध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे सतत फ्लॉप होत आहेत. यापैकी एक मोठं नाव म्हणजे दीपक हुडा. दीपक हुडानं आयपीएलच्या चालू हंगामातील 3 सामन्यात केवळ 44 धावा केल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दीपक हुडा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र बॅटनं काही जादू दाखवण्यापूर्वीच तो 10 चेंडूत केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लखनऊ दीपक हुडाला मागील 2 हंगामांपासून तब्बल 5.75 कोटी रुपये देत आहे. परंतु त्याचा खराब फॉर्म आता संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात हुडा 5व्या षटकातच फलंदाजीला आला होता. त्याच्याकडे संयमानं मोठी खेळी खेळण्यासाठी भरपूर वेळ होता. परंतु त्यानं घाई केली आणि तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. मिशेल स्टार्कच्या चेंडूवर रमणदीप सिंगनं त्याचा शानदार झेल घेतला. हुडामुळे लखनऊची मधली फळी कमकुवत होत आहे. आयपीएल 2023 चा हंगाम देखील दीपक हुडासाठी अजिबात चांगला राहिला नव्हता. गेल्या मोसमात त्यानं 12 सामन्यांत केवळ 84 धावा केल्या होत्या.
दीपक हुडाचा फॉर्म किती खराब आहे यांचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, त्यानं आयपीएलमध्ये शेवटचं अर्धशतक 2022 मध्ये ठोकलं होतं. त्यानं राजस्थान रॉयल्सविरुद्ध 39 चेंडूत 59 धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर 15 डाव उलटले आहेत, परंतु हुडाच्या बॅटमधून एकही मोठी खेळी निघाली नाही. गेल्या 15 डावांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 45 आहे, आणि ती देखील 2022 मध्येच आली होती. आयपीएलमध्ये शेवटच्या 15 सामन्यांमध्ये त्यानं केवळ 128 धावा केल्या आहेत.
दीपक हुडाच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आतापर्यंत 110 सामन्यांच्या 90 डावांमध्ये 1364 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 18.19 आणि स्ट्राइक रेट 128.44 एवढा राहिला आहे. त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 7 अर्धशतक ठोकली आहेत. 64 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जचा विजय प्रीती झिंटासाठी पडला महागात, बनवावे लागले 120 आलू पराठे!
पंजाब किंग्ज अडचणीत, कर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त; जाणून घ्या किती सामने खेळणार नाही