---Advertisement---

दीपक हुडा तिसऱ्यांदा भाग्यशाली; २ वेळा संधी हुकल्यानंतर, अखेर श्रीलंकेविरुद्ध केले टी२० पदार्पण

On: गुरूवार, फेब्रुवारी 24, 2022 8:37 PM
Deepak-Hooda-T20I-Debut
---Advertisement---

गुरुवार रोजी (२४ फेब्रुवारी) लखनऊच्या भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिला टी२० सामना (First T20I) झाला. या सामन्यातून भारताचा फलंदाजी अष्टपैलू दीपक हुडा (Deepak Hooda) याचे टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण (Deepak Hooda T20I Debut) झाले. नुकतेच वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याला टी२० संघातही जागा मिळाली आहे. तो भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ९७ वा खेळाडू बनला आहे. 

महत्त्वाचे म्हणजे, हुडाला यापूर्वी २ वेळा टी२० पदार्पणापासून मुकावे लागले होते. भारताच्या टी२० संघाच्या सेटअपमध्ये फिट न बसू शकल्याने २ वेळा त्याची टी२० पदार्पणाची संधी हुकली होती.

हुडाला डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवडले गेले होते. परंतु त्यातील एकाही सामन्यात तो अंतिम एकादशमध्ये जागा मिळवू शकला नव्हती. पुढे ३ महिन्यांनंतर निदाहास ट्रॉफीसाठी त्याची संघात निवड झाली होती. परंतु त्यावेळीही त्याला त्याची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली नव्हती.

मात्र आता अखेर त्याने टी२० च्या अंतिम एकादशमध्ये जागा मिळवली आहे. स्वत: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याला टी२० पदार्पणाची कॅप दिली आहे.

विशेष म्हणजे, हुडा आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. लखनऊ संघाने ५ कोटी ७५ लाख रुपयांना त्याला विकत घेतले आहे. आता हुडाने आपल्या आयपीएल फ्रँचायझीच्या शहरातूनच टी२० कारकिर्दीची सुरुवात केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---