भारतात स्थानिक क्रिकेटला सुरुवात होत असून दिनांक 10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये देशातील 38 संघ सहभागी होत आहेत पण ही स्पर्धा सुरु होण्याआधीच सर्वांच्या नजरा या कृणाल पांड्या कर्णधार असलेल्या बडोदा संघावर रोखल्या गेल्या आहेत. कारण अशी बातमी समोर येत आहे की बडोदा संघाचा उपकर्णधार दीपक हुड्डाने कर्णधार कृणाल पंड्यावर शिवीगाळ व अपमान केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. तसेच दीपक हुड्डाने स्पर्धेतून माघार देखील घेतली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बडोदा संघाचे बडोदा येथीलच रिलायन्स ग्राउंडवर अभ्यास सत्र सुरू आहे. याच दरम्यान पंड्या व हुड्डा यांच्या दरम्यान कोणत्यातरी कारणामुळे मतभेद झाले. यादरम्यानच पंड्याने हुड्डा विरुद्ध अपशब्द वापरून कारकिर्द संपवण्याची धमकी दिली असल्याचे हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्रात लिहले आहे.
हुड्डाने या प्रकरणासंदर्भात बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. हुड्डाने पत्रात लिहले आहे की ,” मी बडोदा संघाकडून मागील अकरा वर्षापासून खेळतो आहे. माझी सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीसाठी संघात निवड देखील झाली आहे. मात्र, मी सध्या प्रचंड मानसिक तणावात आहे. बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पांड्या मागील काही दिवसांपासून संघ सहकाऱ्यांसमोर माझ्याशी अभद्र भाषेचा वापर करत आहेत. त्यानी मला तू बडोदासाठी आता कसा खेळतोच, ते पाहातो, अशा प्रकारची धमकी दिली.”
या प्रकरणा संदर्भात बडोदा क्रिकेट असोसिएशन काय निर्णय घेते हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बडोदा संघ स्पर्धेतील आपला पहिला सामना 10 जानेवारी रोजी उत्तराखंड संघासोबत खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IND vs AUS: जडेजा तर बाहेर गेला, पंतचे काय? ‘ही’ आहे मोठी अपडेट
एकाच कसोटी सामन्यात शतक-अर्धशतक; एक-दोन नव्हे तब्बल ११ वेळा ‘यांनी’ केलाय हा पराक्रम
सिडनी कसोटीत स्मिथच्या फलंदाजीचा बोलबाला, खोऱ्याने धावा काढत ‘या’ यादीत घेतली टॉप-१० मध्ये उडी






