टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताचे कुस्तीपटू अप्रतिम खेळ दाखवत आहेत. रवी कुमार दहियाने धडाकेबाज प्रदर्शन करत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. त्याच्यानंतर आता भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया हा देखील चमकला आहे. त्यानेही उपांत्यपूर्व सामन्यात जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
उपांत्यपूर्व सामन्यात पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या १/४ फायनल राउंडमध्ये चीनचा लिन झ्यूशेन दीपकचा प्रतिस्पर्धी होता. दोघांमध्ये अखेरपर्यंत काट्याची टक्कर पाहायला मिळाली. सामना संपायला केवळ ४० सेकंदाचा अवधी शिल्लक असताना दीपकने मोठा डाव खेळला आणि झ्यूशेनला ६-३ ने पराभवाची धूळ चारली. यासह दीपकने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
News Flash: #Wrestling : Deepak Punia storms into Semis (FS 87kg) with 6-3 win over Chinese grappler.
It was so close with Deepak scoring winning points in dying seconds.
✨Now just one win away from ensuring a medal for India. #Tokyo2020 #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/OUwvdUH1eE— India_AllSports (@India_AllSports) August 4, 2021
तत्पुर्वी पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या १/८ फायनल राऊंडमध्ये भारताचा कुस्तीपटू दीपकने नायझेरियाच्या एकेरेमकेमे एजीओमोरवर १२-१ ने विजय मिळवत उपांत्यपूर्व सामन्यात जागा मिळवली होती.
दीपक आणि रवी आज दुपारी २.४५ वाजता उपांत्य फेरीचे सामने खेळतील.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी
बेलारूसच्या इरियानाकडून अंशू मलिकचा दारुण पराभव; तरीही जिंकू शकते कांस्य पदक