भारताच्या दीप्ती जीवनजीनं इतिहास रचला आहे. तिनं जपानच्या कोबे येथे आयोजित पॅरा ॲथलेटिक्स जागतिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकलं. दीप्ती जीवनजीनं 400 मीटर शर्यतीत विश्वविक्रम केला आहे. तिनं 400 मीटरची शर्यत अवघ्या 55.07 सेकंदात पूर्ण केली.
याबाबतीत दीप्तीनं अमेरिकन ॲथलीट ब्रेना क्लार्कचा विक्रम मोडला, जो तिनं पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रचला होता. ब्रेना क्लार्कनं पॅरिसमध्ये 55.12 सेकंदात 400 मीटर अंतर कापलं होतं.
तत्पूर्वी, रविवार, (19 मे) दीप्ती जीवनजीनं 56.18 सेकंदाची वेळ नोंदवत नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला होता. यासह तिनं पॅरिस 2024 पॅरालिम्पिक साठी देखील कोटा मिळवला आहे.
दीप्ती जीवनजीनं आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक (56.69 सेकंद) जिंकलं होतं. त्यावेळी तिनं थायलंडच्या ओरवान कैसिंगचा पराभव करून अव्वल स्थान पटकावलं होतं. ओरवान कैसिंगनं 59.00 सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.
पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतानं आतापर्यंत 4 पदकं जिंकली आहेत. यापूर्वी, भारताच्या प्रीती पालनं महिलांच्या 200 मीटर T35 प्रकारात कांस्यपदक जिंकलं होतं. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतानं आतापर्यंत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदकं जिंकली आहेत.
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या मागील आवृत्तीत, भारतानं 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्यांसह विक्रमी 10 पदके जिंकली होती. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 25 मे 2024 पर्यंत चालणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीशी भिडणार हा संघ, क्वालीफायर 1 मध्ये या दोन संघांत लढत
आधी सलग 6 पराभव…मग सलग 6 विजय! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकचे हे आहेत 5 शिल्पकार