सुरत। मंगळवारी(24 सप्टेंबर) भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात (India Women vs South Africa Women) 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने 11 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात 22 वर्षीय दिप्ती शर्माने (Deepti Sharma) महत्त्वाचा वाटा उचलला.
तिने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 8 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे तिने गोलंदाजी केलेल्या 4 षटकांपैकी 3 षटके निर्धाव टाकली. त्यामुळे तिने खास विक्रम केला आहे.
ती एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात तीन षटके निर्धाव टाकणारी पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी पुरुष आणि महिला भारतीय क्रिकेटपटूंध्ये टी20 सामन्यात 3 निर्धाव षटके कोणालाही टाकता आली नव्हती.
याआधी भारताकडून पुरुषांमध्ये हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी तर महिलांमध्ये रुमेली धर, झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात प्रत्येकी 2 निर्धाव षटके टाकण्याचा पराक्रम केला होता.
दिप्तीने मंगळवारी झालेल्या सामन्यात तिने टाकलेली पहिली तिनही षटके निर्धाव टाकली होती. या तीन षटकातच तिने तीन विकेटही मिळवल्या होत्या. पण तिने टाकलेल्या तिच्या चौथ्या षटकात 8 धावा निघाल्या.
या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 130 धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले होते. पण दक्षिण आफ्रिकेच्या महिलांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना 19.5 षटकात सर्वबाद 119 धावाच करता आल्या.
18 balls, 18 dots & 3 wickets.@Deepti_Sharma06 on an absolute roll in Surat. @Paytm #INDWvSAW
Details – https://t.co/QFRNkBAGt9 pic.twitter.com/q1w20ULMkv
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2019
WOW what a performance from Deepti Sharma!
In her side's victory today she recorded figures of 4-3-8-3 🔥 pic.twitter.com/DSIyNLobuY
— ICC (@ICC) September 24, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताकडून वयाच्या १५ व्या वर्षी पदर्पण करणारी कोण आहे शेफाली वर्मा?
–आपल्याला अशीही काही शिक्षा होईल याचा शेन वॉर्नने जन्मातही विचार केला नसेल !
–ती घटना ज्यामुळे विराटला मिळाली आयसीसीकडून शिक्षा, पहा व्हिडिओ