पुणे – देहू फिटर्स आणि व्होबा संघांनी पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. मंगवारी झालेल्या सामन्यातील या संघांच्या विजयातील फरक म्हणजे देहू फिटर्सला विजयासाठी झुंजावे लागले, तर व्हिन्सेंट ओल्ड बॉईज (व्होबा) संघाला बरोबरीवर समाधान मानावे लागले.
सी गटातील सामन्यात देहू फिटर्स संघाने पूना सोशल असोशिएशनचे आव्हान २-१ असे परतवून लावले. प्रज्वल कुमारने ११व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर सोहन कुंजमन याने ५०व्या मिनिटाला संघाची आघाडी वाढवली. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात पूना सोशल संघाकडून ६१व्या मिनिटाला तेजस जाधव याने ही आघाडी एकने कमी केली.
त्यापुर्वी व्होबा संघाला खडकीयन्सने १-१ असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या २१व्या मिनिटाला ब्रेंटन क्रॅस्टो याने मिळवून दिलेली आघाडी व्होबाला टिकवता आली नाही. उत्तरार्धात ५०व्या मिनिटाला फैझल कर्नालकर याने खडकीयन्सला बरोबरी साधून दिली.
अन्य एका सामन्यात आज मॅथ्यू एफ ए संघाने मोठ्या विजयाची नोंद केली.त्यांनी आर्यन्स ब संघाचा ८-० असा पराभव केला. दैविक करिया याने ९ मिनिटांत तीन गोल केले. पहिला गोल त्याने २०व्या, नंतर २८व्या आणि २९व्या मिनिटाला गोल केले. त्यांच्याकडून अन्य गोल पृथ्वीराज माने (२८वे मिनिट), सॅम्युएल भिसे (३४वे, ५४वे मिनिट) आणि अॅस्टन मॅथ्यू (४८वे, ५७वे मिनिट) यांनी केले.
निकाल –
सप महाविद्यालय मैदान – तृतियश्रेणी
अ गट – हायलॅंडर्स एफसी ० बरोबरी वि. एफसी बेकडिन्हो ब ०
ब गट – व्हिन्सेंट ओल्ड बॉईज असोशिएशन १ (ब्रेंटन क्रॅस्टो २१वे मिनिट) बरोबरी वि. खडकीयन्स १ (फैझल करनालकर ५०वे मिनिट)
मॅथ्यू एफए ८ (दैविक करिया २०, २८, २९वे, पृथ्वीराज माने २६वे, सॅम्युएल भिसे ३४, ५४वे मिनिट, अॅस्टन मॅथ्यू ४८वे, ५७वे मिनिट) वि.वि. आर्यन्स ब ०
सी गट – देहू फिटर्स २ (प्रज्वल कुनमार ११वे, सोहन कुंजुमोन ५०वे मिनिट)वि.वि. असोशिएशन पूनान सोशल ब १ (तेजस जाधव ६१वे मिनिट)
डी गट – एफसी पिंपरी चिंचवडा २ (आक्षय पवार पहिले मिनिटल, अफान पानसरे ७वे मिनिट) वि.वि. भोर एफसी ०
गॅलेक्टिको वॉरियर्स १ (विवेक नाथ १०वे मिनिट) वि.वि. सांघवी एफसी ब ०
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटवरील प्रेम म्हणा वा संघनिष्ठा! तब्येत बरी नसतानाही लखनऊसाठी खेळला एविन लुईस, ठरला गेमचेंजर
ऐकलंत का? १७ कोटींनीही नाही भरलं केएल राहुलचं मन, अर्ध्या हंगामात केली पगार वाढीची मागणी!
तेव्हा कुंबळे टेलरला म्हणाला होता ‘स्पिनर्सचा कर्दनकाळ’, वाचा न्यूजीलंडच्या दिग्गजाबद्दल सविस्तर