---Advertisement---

आयसीसीने दिला नागपूर आणि दिल्ली खेळपट्टीला ‘रिमार्क’! भारतीय संघाला…

On: गुरूवार, फेब्रुवारी 23, 2023 8:43 PM
---Advertisement---

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकत आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून खेळला जाईल. तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पहिले दोन सामने खेळलेल्या नागपूर व दिल्ली येथील खेळपट्ट्यांना शेरा दिला आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले होते. भारतीय फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडले. भारतीय संघाने हा सामना अवघ्या तीन दिवसात एक डाव व‌ 132 धावांनी आपल्या नावे केला. त्यानंतर दिल्ली येथील दुसऱ्या सामन्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. पहिल्या दोन दिवसात सामना बरोबरीत होता. मात्र, तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात भारताने नऊ बळी मिळवत सामन्यात आघाडी घेतली. विजयासाठी मिळालेले 115 धावांचे आव्हान भारताने चार गडी गमावत पार केले.

या दोन सामन्यानंतर या दोन्ही खेळपट्ट्यांना शेरा दिला आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीने दिल्ली व नागपूर येथील खेळपट्ट्यांना सरासरी असा शेरा दिला आहे.

आयसीसीकडून प्रत्येक कसोटी सामन्यानंतर खेळपट्टीला शेरा दिला जातो. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध मागील दौऱ्यात पुणे येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातील खेळपट्टीला खराब असा दर्जा देण्यात आलेला. त्यानंतर बेंगलोर येथील खेळपट्टीला देखील सरासरीपेक्षा खराब असा शेरा दिला गेलेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोर येथे खेळला जाईल. तर अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
(Delhi And Nagpur Test Pitches Rate Average By ICC)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला टीम इंडियाला या वर्षात दोनदा जगज्जेता होताना पाहायचेय”, गावसकरांनी व्यक्त केली इच्छा
डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत! फॉर्ममध्ये येण्यासाठी हातात बाकी आहेत थोडेच दिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---