Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत! फॉर्ममध्ये येण्यासाठी हातात बाकी आहेत थोडेच दिवस

डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत! फॉर्ममध्ये येण्यासाठी हातात बाकी आहेत थोडेच दिवस

February 23, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
David-Warner

Photo Courtesy: Twitter/ICC


दिल्ली कसोटीत दुखापत झाल्यानंतर डेविड वॉर्नर मायदेशात परतला. वॉर्नर दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करत असातना चेंडू त्याच्या डोक्याला लागला, ज्यामुळे तो या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीही करू शकला नाही. मायदेशात परतल्यानंतर सिडनी विमानतळावर पत्रकारांनी त्याला गाठले. वॉर्नर 2024 पर्यंत ऑस्ट्रेलियासाठी खेळू इच्छितो असे त्याने यावेळी स्वतः सांगितले.

डेविड वॉर्नर (David Warner) मागच्या काही महिन्यांमध्ये धावा करण्यासाठी झगडताना दिसत आहे. भारताविरुद्ध सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतही त्याचा फॉर्म खराब दिसला. दिल्ली कसोटीत दुखापत झाल्यानंतर वॉर्नर मायदेशी परतला असला, तरी पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचे योगदान काही खास नव्हते. नागपूरमध्ये पहिल्या कसोटीत वॉर्नरने 1 आणि 10 धावांची खेळी केली. तर दिल्ली कसोटीत त्याने एकड डाव फलंदाजी केली आणि 15 धावा करून बाद झाला. सिडनीत पोहोचल्यानंतर वॉर्नरला या सुमार खेलीविषयी विचारले गेले. यावर बोलताना त्याने थेड निवृत्तीच्या विषयाला घात घातला आणि तो 2024 पर्यंत क्रिकेट खेळू इच्छितो असे म्हटले.

सिडनीत माध्यमांसमोर वॉर्नर म्हणाला, “मी नेहमीच म्हणत आलो आहे की, मी 2024 पर्येत खेळणार आहे. जर निवडकर्त्यांना वाटले मी संघात खेळण्यासाठी योग्य नाहीये, तर यात मी काहीच करू शकत नाही. मला पुढचे 12 महिने मिळाले आहेत, ज्यात संघ भरपूर क्रिकेट खेळणार आहे. जर मी धावा केल्या आणि संघासाठी माझे सर्वोत्तम योगदान दिले, तर माझे संघाती स्थानही मिळवू शकतो.”

दरम्यान, वॉर्नरच्या कसोटी आकडेवारीचा विचार केला, तर मागच्या तीन वर्षात त्याने फक्त एक कसोटी शतक केले आहे. त्याने नुकतेच दक्षिण आप्रिकेविरुद्धच्या कसोटीत द्विशतक ठोकून शतकाचा दुष्काळ संपवला. या द्विशतकीय खेळीनंतर वॉर्नरला दुखापत झाल्याचेही समोर आले होते. त्याची बॅट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सध्या शांत दिसत आहे. स्वतःचे प्रदर्शन पाहता वॉर्नरने निवृत्तीची तयारी आधीच केल्याचे दिसते. निवृत्तीपूर्वी संघात संधी द्यायची की नाही, हा निर्णय मात्र त्याने निवडकर्त्यांवर सोडला आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतून त्याने माघार घेतली असली, तरी भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वॉर्नर पुन्हा संघासोबत जोडला जाऊ शकतो.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
पैट कमिंस (कप्तान), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कैरी, कैमरून ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, जे रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर और एडम जैंपा.
(David Warner has made a big comment about his retirement from international cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक: उपांत्य सामन्यात टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी! हरमन फिट, संघात तीन बदल
“आधी देश आणि मग मुंबई इंडियन्स”, बुमराहच्या मुद्द्यावर बरसला भारतीय दिग्गज


Next Post
Shoaib Akhtar

लाईव्ह शोमध्ये सुटला अख्तरचा जिभेवरचा ताबा, खराब इंग्लिशमुळे सहकाऱ्याचा अपमान

Photo Courtesy: Twitter

आयसीसीने दिला नागपूर आणि दिल्ली खेळपट्टीला 'रिमार्क'! भारतीय संघाला...

Australia Womens

नेहमीप्रमाणे यावेळीही उपांत्य सामन्यात स्मृती मंधाना अपयशी, पाहा कसा आहे यापूर्वीचा रेकॉर्ड

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143