आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत निम्मे सामने खेळले गेले आहेत. 7 पैकी 5 सामने जिंकून मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्याचबरोबर किंग्स इलेव्हन पंजाब आठव्या क्रमांकावर असून चेन्नई सुपर किंग्स सहाव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर आणि इंग्लंडचा माजी अनुभवी फिरकीपटू ग्रॅम स्वानने चेन्नई आणि पंजाब प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाहीत, असे म्हटले आहे.
आगरकरला असा विश्वास आहे की मुंबई इंडियन्स (एमआय), दिल्ली कॅपिटलस (डीसी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) हे तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्यास सक्षम असल्याचे स्वानने म्हटले आहे.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट संघ: आगरकर
एका शोदरम्यान आगरकर म्हणाला, “आयपीएलचा हा हंगाम खूप रोमांचक आहे. कारण या हंगामात काही अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. माझ्या मते मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत चांगला खेळ केला आहे आणि हे दोन संघ या हंगामातील सर्वोत्कृष्ट संघ आहेत. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध जबरदस्त खेळ केला होता. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी स्पर्धा होऊ शकेल. हे दोन्ही संघ सीएसकेपेक्षा चांगले चांगले खेळत आहेत.”
अष्टपैलू बेन स्टोक्सच्या आगमनामुळे राजस्थान मजबूत- स्वान
इंग्लंडचा माजी अनुभवी फिरकीपटू ग्रॅम स्वान म्हणाला की, “सनरायझर्स हैदराबाद संघ खूप संतुलित आहे. हैदराबादचा सलामीवीर फलंदाज बेयरस्टो शानदर फॉर्ममध्ये आहे. मला खात्री आहे की हैदराबाद संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल. राजस्थान संघाने चार सामने गमावले असले तरी हा संघ निश्चितपणे पात्र ठरु शकतो. बेन स्टोक्सच्या पुनरागमनमुळे संघ आणखी मजबूत झाला आहे.”
गुणतालिकेत धोनीचा संघ आहे सहाव्या स्थानी
यावर्षी धोनीचा संघ सीएसकेला काही खास कामगिरी करता आलेली नाही. सीएसके सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यांनी 8 पैकी 5 सामने गमावले आहेत तर 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी पुढील सामने जिंकणे आवश्यक आहे. तसेच सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स अनुक्रमे पहिल्या 2 क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020: आज दिल्ली-राजस्थान येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
फिरकीने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या राशिदविरुद्ध धावा करायच्यात ना? सेहवागच्या ‘या’ टिप्स ऐका
वाह क्या बात है! धोनीचा अवघड झेल घेण्यात अपयशी ठरल्यानंतरही होतेयं संदीपचं कौतुक, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार
IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू