---Advertisement---

Video : दिल्ली-हैदराबाद सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये मारामारी, एकमेकांना दिला लाथा-बुक्क्यांचा प्रसाद

DC-vs-SRH
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघाला शनिवारी (दि. 29 एप्रिल) आपल्या घरच्या मैदानावर नजीकच्या पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स हैदराबाद संघाने अरुण जेटली स्टेडिअम दिल्ली येथे दिल्लीचा 9 धावांनी पराभव केला. हैदराबादने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 197 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला 6 विकेट्स गमावत 188 धावाच करता आल्या. त्यामुळे या सामन्यात दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. 8 सामन्यांतील दिल्लीचा हा सहावा पराभव ठरला. यासह दिल्ली 4 गुणांसह गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे. अशातच आता या सामन्यातून एक व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओत चाहत्यांमध्ये जोरदार मारामारी झाल्याचे दिसत आहे.

दिल्ली विरुद्ध हैदराबाद (Delhi vs Hyderabad) संघातील सामन्यात जोरदार भांडणही झाले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन्ही संघाचे चाहते एकमेकांशी मारामारी करताना दिसत आहेत. व्हिडिओत स्पष्ट दिसते की, चाहते वाईट पद्धतीने भांडत आहेत.”

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम (Arun Jaitley Stadium) येथे भांडण होण्याची ही पहिली वेळ नाहीये. राजधानीच्या या ऐतिहासिक मैदानावर यापूर्वीही असे झाले आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मागील वर्षी पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही असेच काहीसे झाले होते.

सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर हैदराबादकडून सलामी फलंदाज अभिषेक शर्मा याने 36 चेंडूत 67 धावा केल्या. तसेच, यष्टीरक्षक फलंदाज हेन्रीच क्लासेन याने 27 चेंडूत 53 धावांची खेळी साकारली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने 197 धावा केल्या होत्या. यावेळी दिल्लीकडून मिचेल मार्श याने 4 षटकात 27 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खास झाली नाही. डेविड वॉर्नर पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमार याच्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद झाला. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्ट (59) आणि मिचेल मार्श (63) यांनी मिळून दिल्लीचे पुनरागमन केले. मात्र, ते दोघेही बाद झाल्यानंतर सामना हैदराबादच्या बाजूने गेला. शेवटी हैदराबादने सामना 9 धावांनी जिंकला. हैदराबाद गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. (delhi capitals and sunrisers hyderabad fans fighting at arun jaitley stadium delhi ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान सुधरणार नाही! लाईव्ह सामन्यात घडली मोठी चूक, अंपायर्सनी लगेच थांबवली मॅच; पाहा व्हिडिओ
मोहम्मद शमीने मोडलं KKRचं कंबरडं, IPL 2023मध्ये केली अनोखी ‘शंभरी’, सिराजनंतर बनला दुसराच गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---