आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (24 एप्रिल) गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असलेले सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ समोरासमोर आले. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आले. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने या सामन्यात केवळ 21 धावा केल्या. या छोट्याशा खेळी दरम्यानही त्याची नोंद एका खास यादीत झाली.
या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरने या सामन्यातही चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा त्याला रोखण्यात यश मिळवले. त्याने 20 चेंडूवर 2 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या.
वॉर्नरने या हंगामातील पहिला षटकार मारण्यासाठी तब्बल सात सामने घेतले. मात्र, हा षटकार मारण्यासोबतच तो कर्णधार या नात्याने 100 षटकार पूर्ण करणारा आयपीएलमधील चौथा कर्णधार ठरला. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज एमएस धोनी असून त्याने तब्बल 214 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर या यादीमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली असून त्याच्या नावे 168 षटकारांची नोंद आहे. तसेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने देखील 151 षटकार मारण्यात यश मिळवले.
वॉर्नर याने आत्तापर्यंत या हंगामात सहा सामने खेळताना 51 च्या सरासरीने 306 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश देखील आहे. स्वतः वॉर्नर चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी, दिल्ली संघाला मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सलग पाच पराभवानंतर त्यांनी सहाव्या सामन्यात केकेआरला पराभूत करत हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला होता.
(Delhi Capitals Captain David Warner Complete 100 Sixes As Captain In IPL 2023 Dhoni Rohit Virat Lead)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी
अखेर पृथ्वीला बाहेर बसवलेच! सातत्याने अपयशी ठरल्याने दिल्लीला घ्यावा लागला कठोर निर्णय