---Advertisement---

अखेर पृथ्वीला बाहेर बसवलेच! सातत्याने अपयशी ठरल्याने दिल्लीला घ्यावा लागला कठोर निर्णय

On: सोमवार, एप्रिल 24, 2023 9:06 PM
Prithvi Shaw
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (24 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ समोरासमोर आले. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीने दोन महत्त्वपूर्ण बदल केले. आत्तापर्यंत अपयशी ठरलेला सलामीवीर पृथ्वी शॉ याला अखेर या सामन्यासाठी बाहेर बसवले गेले.

पृथ्वी शॉ यावर्षी देशांतर्गत हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. त्यामुळे या आयपीएलमध्ये तो त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, तो या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. त्यामुळे हैदराबाद विरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हन तसेच इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट या दोन्ही ठिकाणी स्थान मिळाले नाही.

शॉ यावर्षी अत्यंत खराब फॉर्ममध्ये राहिला आहे. सहा सामन्यातील त्याची सर्वोच्च धावसंख्या 15 राहिली असून, मुंबई इंडियन्सविरुद्ध आली होती. त्याने या हंगामात सहा डावांमध्ये 12,7,0,15,0 व 13 अशा धावा केल्या. त्याला दोन वेळा खाते देखील खोलता आले नाही. त्यामुळे त्याच्या जागी हैदराबादविरुद्ध रिपल पटेल याचा समावेश केला गेला.

पृथ्वी खराब फॉर्ममध्ये असल्याने दिल्ली कॅपिटल्सने काही दिवसांपूर्वीच‌ बंगालचा अनुभवी सलामीवीर अभिमन्यू ईस्वरन व उत्तर प्रदेशचा कर्णधार प्रियम गर्ग यांना चाचणीसाठी बोलावले होते. कमलेश नागरकोटी दुखापतग्रस्त झाल्याने गर्ग याचा संघात समावेश केला गेला आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, मनीष पांडे, सर्फरज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एन्रिक नोर्कीए, कुलदीप यादव, इशांत शर्मा.

(Finally Delhi Capitals Benched Prithvi Shaw Against Sunrisers Hyderabad In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी 
SRHvDC| नाणेफेक जिंकत दिल्लीची प्रथम फलंदाजी, वॉर्नर 4 वर्षानंतर खेळणार हैदराबादमध्ये 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---