आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (24 एप्रिल) एकमेव सामना खेळला जाईल. गुणतालिकेत शेवटी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्यावर असेल. सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेला वॉर्नर यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार राहिला आहे. तब्बल चार वर्षानंतर वॉर्नर आपल्या अनेक अविस्मरणीय खेळी केलेल्या मैदानावर कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
वॉर्नर हा यापूर्वी हैदराबादचा कर्णधार होता. 2015 ते 2020 या कालावधीत तो हैदराबादचे नेतृत्व करत होता. यादरम्यान संघाने सातत्याने प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. 2016 मध्ये हैदराबादने जिंकलेल्या एकमेव विजेतेपदावेळी तोच कर्णधार होता. त्यामुळे आता चार वर्षानंतर तो या मैदानावर उतरेल.
वॉर्नर याची हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवरील कामगिरी कमालीची सातत्यपूर्ण राहिली आहे. त्याने या मैदानावर 31 सामने खेळताना 1602 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 66.75 व स्ट्राईक रेट 161 पेक्षा जास्त राहिला आहे. यामध्ये 15 अर्धशतक व 3 शतकांचा समावेश आहे. त्याचीही कामगिरी पाहता त्याचा सध्याचा दिल्ली कॅपिटल्स संघ त्याच्याकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा करत असेल.
वॉर्नर याचा चालू हंगामातील खेळ पाहिल्यास तो पुन्हा एकदा मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. त्याने आत्तापर्यंत या हंगामात सहा सामने खेळताना 47.50 च्या सरासरीने 285 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश देखील आहे. स्वतः वॉर्नर चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी, दिल्ली संघाला मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सलग पाच पराभवानंतर त्यांनी सहाव्या सामन्यात केकेआरला पराभूत करत हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला होता.
(Delhi Capitals Captain David Warner Tremendous Records At Rajiv Gandhi International Cricket Stadium Hyderbad For Sunrisers Hyderabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कोलकात्यात मिळालेल्या प्रेमाने भारावला धोनी! म्हणाला, “तुम्ही मला निरोप देण्यासाठी…”
वाढदिवस विशेष: सचिन विरुद्ध ऑस्ट्रेलिया…