मुंबई । दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग गुरुवारी दुबईला पोहोचला. इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामापूर्वी रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाहून युएईला दाखल झाला आहे. तेथे तो दिल्ली संघातील खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे. तथापि, त्याआधी, रिकी पॉन्टिंगला त्याच्या हॉटेलच्या खोलीत 6 दिवस अलग रहावे लागेल. येथून ते टीममेटला ऑनलाईन भेटू शकतील.
आयपीएल 2020 स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वी, सर्व संघांना सुमारे 3-3 आठवड्यांपर्यंत सराव सत्रात भाग घेणार आहेत. कारण कोरोना विषाणूच्या साथीमुळे बरेच दिवस खेळाडू मैदानात उतरलेले नाहीत. म्हणूनच संघाचे खेळाडू इतक्या लवकर युएईमध्ये दाखल झाले आहेत. रिकी पॉन्टिंग दुबईत आल्यानंतर भारतीय संघाचा ऑफस्पिनर आर अश्विनसोबत चर्चा करणार आहे, कारण मांकडिंगबाबत दोघांमध्ये वाद सुरू आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी आपल्या हॉटेलच्या खोलीतून ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात एक मोठा जलतरण तलाव दिसत आहे. त्याच्या मागे डझनभर उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये पॉन्टिंग यांनी लिहिले आहे की, “पुढील 6 दिवसांकरिता माझे हॉटेलमधील क्वारंटाईन अधिकृतपणे सुरू झाले आहे.”
My view for the next 6 days, hotel quarantine is officially underway. pic.twitter.com/gsH191DBvN
— Ricky Ponting AO (@RickyPonting) August 27, 2020
जगभरात सुरू असलेल्या कोविड -19 संकटांमुळे 13 वा आयपीएल हंगाम भारतामधून युएईमध्ये हलविण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू आणि इतर सहाय्यक कर्मचारी 23 ऑगस्टला आधीच येथे दाखल झाले होते. दुसरीकडे, आयपीएलपूर्वी पॉन्टिंग यांनी अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनला मांकडिगचा वापर करु देणार नाही असे विधान केले होते. लवकरच ते दोघे याविषयावर चर्चा करणार आहेत.