---Advertisement---

सीएसके जरा जपून! पहिल्या लढतीत स्टिव्ह स्मिथ करणार ‘या’ क्रमांकावर फलंदाजी

On: बुधवार, एप्रिल 7, 2021 12:11 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२१ लिलावात ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला आपल्या संघात सामील केले होते. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार असलेल्या स्मिथला यंदाच्या लिलावापूर्वी राजस्थान संघाने मुक्त केले होते. यानंतर आता दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी स्मिथच्या दिल्ली संघात असण्याने आम्हाला खूप फायदा होणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

पाँटिंग म्हणाले की, “मला वाटते की तो इतकी वर्ष ज्या संघासोबत खेळला, त्या संघाने त्याला सोडल्यानंतर आता यावर्षी त्याची धावा करण्याची भूक वाढली असेल. त्यामुळे आमच्याबरोबर खेळण्याची त्याला संधी मिळाली आहे. तर मला खात्री आहे की तो अव्वल तीन क्रमांकात फलंदाजी करताना दिसेल. तसेच मला पुर्ण विश्वास आहे, त्याचे हे आमच्यासोबतचे वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले जाईल.”

“काही दिवसांपूर्वी मी त्याला भेटलो असून या मोसमात तो मैदानावर चांगली खेळी करण्यास उत्सुक आहे. जर यावर्षी त्याने चांगली कामगिरी केली तर पुढील वर्षी पुन्हा होणाऱ्या लिलावात त्याच्यावर खूप मोठी बोली लागू शकते,” असे पुढे पाँटिंग म्हणाले.

“तो आमच्या संघाचा एक भाग आहे, हीच आमच्या संघासाठी चांगली गोष्ट आहे. जरी यावर्षी त्याला संघात खेळायची संधी मिळाली नाही तरी त्याच्याकडे असलेल्या टी-20 क्रिकेटच्या अनुभवाचा आमच्या संघासाठी खूप फायदा होणार असून त्याच्याबरोबर पुन्हा एकदा मला काम करण्यास खूप उत्सुक आहे.” असे त्यांनी म्हटले.

दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना मुंबई येथे बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे. १० एप्रिल रोजी हा सामना होईल. अशात पहिल्या सामन्यात संधी मिळाल्यास स्मिथ कशाप्रकारे फलंदाजी करतो? हे पाहाणे रोमांचक ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

देशात कोरोनाचा विस्फोट, बीसीसीआयचा मोठा निर्णय! पाहा आता कोणत्या शहरात होणार आयपीएलचे सामने

मोईन अलीला अतिरेकी म्हणणाऱ्या तस्लीमा नसरीनवर भडकला जोफ्रा आर्चर; म्हणाला, ‘तू बरी आहेस ना, मला..’

मोठी बातमी! आयपीएलपुर्वी आरसीबीच्या चितेंत भर, पड्डीकलनंतर ‘हा’ अष्टपैलू कोरोनाच्या विळख्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---