दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू मिशेल मार्शबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. मार्शला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. असे सांगितले जात आहे की, दिल्ली संघात चिंतेचं वातावरण आहे. मार्शला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त दिल्लीच्या हॉटेल स्टाफमधील ३ सदस्य, एक डॉक्टर आणि सोशल मीडिया टीमचे सदस्य कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ही बातमी दिल्ली संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी दुखावणारी आहे. (Mitchell Marsh Hospitalised)
मार्शबद्दल दिल्ली कॅपिटल्सची महत्त्वाची माहिती
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एका निवेदनात ६.५ कोटी रुपयांना संघात घेतलेल्या मार्शबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, “अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शची (Mitchell Marsh) कोव्हिड-१९ची चाचणी पॉझिटिव्ह आलीये. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्सची वैद्यकीय टीम मार्शच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.”
A few more members from the Delhi Capitals bio-bubble, including support staff members, have returned positive tests as well. Though they are all asymptomatic, their condition is being monitored closely by the franchise.
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 18, 2022
मंगळवारी (दि. १२ एप्रिल) संपूर्ण दिल्लीच्या सदस्यांना त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण, आरटी- पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या होत्या. पहिली चाचणी निगेटिव्ह आली, पण बीसीसीआय (BCCI) आणखी चाचण्या करण्यासाठी दुसरी वैद्यकीय टीम पाठवत आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार दिल्ली संघाला आपला पुढील सामना बुधवारी (दि. २० एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी सोमवारी (दि. १८ एप्रिल) दिल्ली संघाला मुंबईहून पुण्याला निघायचे होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या हवाल्याने असे म्हणले गेले होते की, सामना नियोजित वेळेतच होईल. मात्र, आता दिल्ली संघातील सदस्य कोरोनाग्रस्त झाल्यानंतर या सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दिल्ली संघाची हंगामातील कामगिरी
दिल्ली संघाने या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहे. यापैकी फक्त २ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. उर्वरित ३ सामन्यात त्यांनी पराभवाचा सामना केलाय.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! कोरोना पॉझिटिव्ह मिशेल मार्शचा आरटी- पीसीआर रिपोर्ट आला
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट