कार्लोस ब्रेथवेट वेस्ट इंडिज संघाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. ब्रेथवेटने २०१६ साली टी२० विश्वचषकात सलग ४ चेंडूत ४ षटकार मारत वेस्ट इंडिजला चॅम्पियन बनवले होते. ब्रेथवेट दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. तो बऱ्याच काळानंतर मैदानावर परतला आहे. मात्र, त्याचे मैदानावर झालेले पुनरागमन काही खास ठरले नाही. तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. मात्र, दुसरीकडे त्याची गाडीही चोरीला गेली.
झाले असे की, ३३ वर्षीय कार्लोस ब्रेथवेटने (Carlso Brathwaite) बर्मिंघम डिस्ट्रिक्ट प्रीमिअर लीगमध्ये आपले पदार्पण केले होते. त्याचे पदार्पण कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हते. कारण, दुसरीकडे त्याची गाडीही चोरीला गेली. याची माहिती स्वत: ब्रेथवेटने दिलीये. (Carlos Brathwaite Car Stolen)
कार्लोस ब्रेथवेटची गाडी झाली चोरी
ब्रेथवेटने १६ एप्रिल रोजी बऱ्याच दिवसांनंतर मैदानावर पुनरागमन केले. मात्र, ब्रेथवेट या सामन्यात पहिल्या चेंडूवरच बाद झाला. याव्यतिरिक्त तो गोलंदाजी करताना एकही विकेट घेऊ शकला नाही. इतकेच नाही, तर त्याची गाडीही चोरीला गेली. याची माहिती त्याने ट्वीट करून दिली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
ब्रेथवेटने ट्वीट करताना त्याने लिहिले की, “काल काय दिवस होता. सहा महिन्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदा सामन्यात गोलंदाजी केली. मोठा शॉट खेळण्याच्या नादात पहिल्याच चेंडूवर बाद झालो आणि त्यावरून माझी गाडीही चोरीला गेली. मात्र, तुम्हाला माहितीये का, आज सकाळी उठलो, सूर्य चमकत आहे आणि धन्यवाद देत आहे.”
ब्रेथवेट बाद होतानाचा व्हिडिओ व्हायरल
वेस्ट इंडिजला जिंकून दिलेत अनेक सामने
ब्रेथवेटने आपल्या कारकीर्दीची सुरुवात २०११साली केली होती. ब्रेथवेटने वेस्ट इंडिजसाठी ३ कसोटी, ४४ वनडे आणि आंतरराष्ट्रीय ४१ टी२० सामने खेळले आहेत. ब्रेथवेट ऑगस्ट २०१९पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाहीये. मागील काही काळापासून तो कधी फॉर्मशी, तर कधी दुखापतींमुळे चिंतेत राहिलाय. यामुळेच तो वेस्ट इंडिजच्या संघातून आत-बाहेर होत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! कोरोना पॉझिटिव्ह मिशेल मार्शचा आरटी- पीसीआर रिपोर्ट आला
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट






