भारताचा युवा प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. त्याने आपल्या नेतृत्वाखाली सन 2018 साली भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकवून दिला होता. मात्र आयपीएलमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच निराश केले आहे. मागील 6 डावात, 19 ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती.शनिवारी (31 नोव्हेंबर ) मुंबई इंडियन्स विरुद्ध तो केवळ 10 धावा करून बाद झाला. खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
https://twitter.com/VamosVirat/status/1322486272837865473?s=19
Probably this Australia tour will be the last tour of Prithvi Shaw with team india.
Senseless batting.Prithvi Shaw worst batsman with MRF bat?@CctvGuider
— accident lawyer (@CctvGuider) October 31, 2020
Apparently Ravi Shashtri turned upto the IPL game today to give Pant and Prithvi Shaw one last chance to impress him and get into the white ball squad for the Aus tour pic.twitter.com/B8sZrmLYPB
— David Brent Loves IPL (@DavidBrentIPL) October 31, 2020
https://twitter.com/somenathpaul_/status/1322539341520887813?s=19
Prithvi Shaw vs Ishan Kishan. Who you got? #MIvsDC #ipl2020
— Sid (@siddhiman) October 31, 2020
Footwork of Bauji on wheel chair is much prominent that Prithvi Shaw's footwork at the crease.
— Sir Yuzvendra (parody) (@SirYuzvendra) October 31, 2020
मागील 6 डावात पृथ्वी शॉ दोनदा शून्यावर बाद झाला आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामात पृथ्वीने 11 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 19.90 च्या सरासरीने 219 धावा केल्या आहेत. 66 ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.
पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
पृथ्वी शॉने भारताकडून 4 कसोटी सामने खेळले आहेत.यात त्याने 55.83 च्या सरासरीने 335 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 134 होती. भारताकडून त्याने 3 वनडे सामने खेळले आहे. यात त्याने 28 च्या सरासरीने 84 धावा केल्या आहेत. 40 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झाली निवड
पृथ्वी शॉने भारताकडून खेळलेल्या 4 कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. यात त्याने 2 अर्धशतक आणि एक शतक ठोकले होते. यामुळेच नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची कसोटी संघात निवड झाली आहे.