सोमवारी (दि. 24 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील एक रोमांचक सामना चाहत्यांना ‘याची देही याची डोळा’ पाहता आला. सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स संघ या सामन्यात आमने-सामने होते. हा सामना दिल्लीने अखेरच्या षटकात 7 धावांनी जिंकला. दिल्लीकडून शेवटचे षटक 5.50 कोटी रुपयांचा गोलंदाज मुकेश कुमार टाकत होता. त्याच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने हंगामातील दुसऱ्या विजयाचं पाणी चाखलं.
दिल्लीकडून हैदराबादचा पराभव
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 विकेट्स गमावत 144 धावा केल्या होत्या. 145 धावांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 137 धावाच करता आल्या. यावेळी हैदराबादकडून वॉशिंग्टन याने 15 चेंडूत 24 धावांची नाबाद खेळी साकारली. मात्र, त्यालाही संघाला सामना जिंकून देता आला नाही. अशात दिल्लीने हा सामना 7 धावांनी जिंकला.
वॉशिंग्टनही जिंकून देऊ शकला नाही विजय
हेन्रीच क्लासेन याने हैदराबादकडून 19 चेंडूत 31 धावांची खेळी साकारली. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. दिल्लीच्या 5.50 कोटी रुपयांच्या गोलंदाजाने हैदराबादच्या तोंडचा विजय पळवला. चला सामन्याला कलाटणी देणाऱ्या षटकाविषयी जाणून घेऊयात…
मुकेश कुमारने टाकले अखेरचे षटक
खरं तर, शेवटच्या षटकापूर्वी विजय हा हैदराबादच्या पारड्यात जातोय, असे दिसत होते. वॉशिंग्टन खेळपट्टीवर सेट होता. तो चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचवण्याचेही काम करत होता. यावेळी अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज होती. तसेच, कर्णधार वॉर्नरने त्याचा युवा गोलंदाज मुकेश कुमार याच्यावर विश्वास दाखवला. यापूर्वी मुकेशने एक षटकात 15 धावा खर्च केल्या होत्या.
If @davidwarner31's reaction can sum it up… 😀 👌@DelhiCapitals register their 2⃣nd win on the bounce as they beat Sunrisers Hyderabad by 7 runs. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/ia1GLIX1Py #TATAIPL | #SRHvDC pic.twitter.com/OgRDw2XXWM
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
मात्र, कर्णधाराने त्याच्यावर विश्वास टाकला आणि त्यानेही विश्वास सार्थ ठरवला. अखेरच्या षटकात मुकेशने कसून गोलंदाजी केली. त्याने यावेळी वॉशिंग्टन सुंदर आणि मार्को यान्सेन यांना एकही चौकार किंवा षटकार मारण्याची संधी दिली नाही. त्याने यावेळी अखेरच्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या. तसेच, दिल्लीला 7 धावांनी शानदार विजय मिळवून दिला. (delhi capitals fast bowler mukesh kumar last over was the turning point of srh vs dc match ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! विराटला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नेतृत्व करणे महागात, ‘या’ चुकीसाठी बसला लाखोंचा दंड
स्वत: SRHचा कर्णधार 3 धावांवर झाला बाद, पण पराभवासाठी ‘या’ खेळाडूंना धरलं जबाबदार, म्हणाला…