इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे. तत्पुर्वी बीसीसीआयने आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले होते. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळवला जाणार आहे.
युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्स या संघाचे नेतृत्व यावर्षी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत करणार आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने दुखापतीमुळे या हंगामातून माघार घेतल्याने पंतवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावर्षीही दिल्ली संघात कायम असलेले आर अश्विन, रिषभ पंत, अक्षर पटेल हे खेळाडू दमदार फॉर्ममध्ये आहेत. तसेच त्यांनी यंदा टॉम करन, स्टिव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज असे काही परदेशी स्टार खेळाडू विकत घेतले आहेत. त्यामुळे पंतचा संघ अजून जास्त मजबूत बनला आहे.
गतवर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारुनही दिल्लीचे आयपीएल चषक उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. मुंबई इंडियन्सने त्यांच्या हातून विजेतेपद हिरावून घेतले होते. मात्र यावर्षी दिल्ली संघ दुप्पट उत्साह आणि तयारीसह आयपीएलच्या रणसंग्रमात उतरेल. यावर्षी आयपीएलमधील दिल्लीचा पहिला सामना १० एप्रिल रोजी मुंबई येथे तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे.
आयपीएलचा हा चौदावा हंगाम यावर्षी ५१ दिवसांचा असणार आहे. ९ एप्रिल ते २३ मेपर्यंत या साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने २५ मेपासून सुरु होतील. तसेच यावर्षी आयपीएलमध्ये ११ डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.
The Indian Summer is back 💙
The #VIVOIPL 2021 Fixtures are out and our excitement knows no bounds 🤩
Which city are you most looking forward to see DC play in? 🤔#YehHaiNayiDilli #IPL2021 pic.twitter.com/Uhwb5EhOqx
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 7, 2021
असे आहे आयपीएल २०२० मधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक-
१० एप्रिल – मुंबई, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१५ एप्रिल – मुंबई, राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल – मुंबई, दिली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२० एप्रिल – चेन्नई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदारबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२७ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२ मे- अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
११ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१४ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
दिल्ली कॅपिटल्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स, एन्रिच नॉर्किए, ख्रिस वोक्स, प्रविण दुबे, टॉम करन, स्टिवन स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमन हुसेन मेरिवाला, एम सिद्धार्थ
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१: ‘ऑरेंज आर्मी’ची पहिली भिडंत केकेआरविरुद्ध, पाहा त्यांचे संपूर्ण वेळापत्रक