इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना मुंबईने एकहाती जिंकला. मुंबईने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला अवघ्या 143 धावाच करता आल्या.
या सामन्यात दिल्लीची वरची आणि मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. पहिले 3 फलंदाज तर शून्य धावसंख्येवरच बाद झाले होते. तर दिल्लीचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत देखील पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 9 चेंडूत केवळ 3 धावा केल्या. या महत्वाच्या सामन्यात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर सोशल मीडियावर रिषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सची जोरदार खिल्ली उडत आहे. तर मुंबई इंडियन्सचे आणि त्यांच्या गोलंदाजांचे जोरदार कौतुक होत आहे.
https://twitter.com/Kalyandkc76/status/1324391410003443712?s=20
https://twitter.com/SakshiNegi_7/status/1322501034036506624
https://twitter.com/Theboysthing/status/1324401653492051970
https://twitter.com/ashusarcastic/status/1324391787146801153?s=19
https://twitter.com/ziaf123/status/1324401323064782849
https://twitter.com/Winysharma619/status/1324389995545718784?s=19
https://twitter.com/45kkushagra/status/1322793019066572801
https://twitter.com/sidsanaaa/status/1322510630578909186
https://twitter.com/reaadubey/status/1324387963954843648
https://twitter.com/_anujthakur/status/1324402070498152449
https://twitter.com/smitterati_/status/1324576989412425729
https://twitter.com/RPantr/status/1324389930861121537?s=19
https://twitter.com/DelhiCapitals/status/1324391388369231872?s=19
https://twitter.com/Alsayyamkhan72/status/1324390286814949378?s=19
https://twitter.com/EkMastAadmi/status/1324390338107039751?s=19
https://twitter.com/Ctrlmemes_/status/1324390351444979715?s=19
https://twitter.com/srcsmic_enginer/status/1324390323343142912?s=19
https://twitter.com/t_h_e_memer/status/1324391337240657920?s=19
https://twitter.com/SamCurranFC07/status/1324391916826341377?s=19
https://twitter.com/JaiswalTanmay/status/1324391268592488449?s=19
https://twitter.com/AniketDolas_/status/1324392210117259264?s=19
हार्दिक, ईशानने केली जोरदार फटकेबाजी
नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सलामीवीर क्विंटन डी कॉकने 40 धावा केल्या. त्याचवेळी सूर्यकुमार यादवनेही आक्रमक फलंदाजी करत 51 धावा केल्या. युवा फलंदाज ईशान किशनने शानदार फलंदाजी करत 55 धावा केल्या. विस्फोटक फलंदाज हार्दिक पंड्याने अवघ्या 14 चेंडूत 37 धावा केल्या. त्यामुळे मुंबईने 20 षटकांत 200 धावा केल्या.
स्टॉयनिस आणि अक्षरने केली उत्तम फलंदाजी
प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. दिल्लीने एकही धाव न काढता 3 फलंदाज गमावले. केवळ 20 धावांत या संघाने 4 गडी गमावले. पण त्यानंतर अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने 65 धावा केल्या. त्याचबरोबर अष्टपैलू अक्षर पटेलनेही 42 धावा केल्या. मात्र, दिल्लीला लक्ष्य गाठता आले नाही आणि 57 धावांनी हा सामना गमावला.
दिल्लीचा पुढील सामना एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघाशी होईल
आयपीएलमध्ये शुक्रवारी (6 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सन राईझर्स हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करेल.हा सामना रविवारी (8 नोव्हेंबर) खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
क्वालिफायर सामन्यानंतर पर्पल कॅप बुमराहच्या डोक्यावर तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठे बदल
मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये झालं गणपती व लक्ष्मीचं दर्शन, पाहा फोटो
करावं ते तेवढं कौतूक कमीच! आयपीएलमध्ये कुणालाही न जमलेला विक्रम सूर्यकुमारच्या नावावर






