---Advertisement---

LSG vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, लखनऊला फलंदाजीचे आमंत्रण! पहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

On: मंगळवार, एप्रिल 22, 2025 7:06 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 40वा सामना आज (22 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (DC vs LSG) संघात खेळला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ एकन्ना क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने आहेत. दिल्लीचा संघ अक्षर पटेलच्या (Axar Patel), तर लखनऊचा संघ रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसेल. दरम्यान या सामन्याचा टाॅस जिंकून दिल्लीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi Capitals have won the toss and have opted to field)

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-

दिल्ली कॅपिटल्स- अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुकेश कुमार

लखनऊ सुपर जायंट्स- एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), अब्दुल समद, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, रवी बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव

दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर लखनऊचा संघही 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून दोन्ही संघ प्लेऑफच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. यंदाच्या हंगामातील चौथ्या सामन्यात दोन्ही संघाची लढत झाली होती. या सामन्यात दिल्लीने लखनऊच्या तोंडातून शानदार विजय खेचून आणला होता. या विजयाचा खरा मानकरी युवा प्रतिभावान फलंदाज आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma) ठरला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातही संघाला त्याच्याकडून उत्कृष्ट खेळीची अपेक्षा असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---