---Advertisement---

टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका, ‘हा’ धाकड अष्टपैलू जायबंदी; आयपीएलदरम्यान झाली दुखापत

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 9:32 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मधील ३३ वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने होते. या दोन्ही संघांसाठी हा आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिलाच सामना होता. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजीमध्ये आणि नंतर फलंदाजीत चांगले प्रदर्शन करत सनरायझर्स हैदराबाद संघाला ८ विकेट्स राखत मात दिली.

सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला असला तरीही संघाची चिंता वाढवणारी एक साहिती समोर येत आहे. सामन्यादरम्याम ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टोयनिस याला दुखापत झाली आहे.

याबाबत संघाकडून अद्याप स्पष्ट माहिती दिली गेलेली नाही. मात्र, स्टोयनिसच्या दुखापतीनंतर आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने ऑस्ट्रलियाच्या संघाची चिंता वाढेल, यात शंकाच नाही. टी२० विश्वचषकासाठी जो ऑस्ट्रेलियाचा संघ निवडला गेला आहे, त्यामध्ये मार्कस स्टोयनिसचा सहभाग असून तो एक महत्वाचा खेळाडू आहे. स्टोयनिसची ही दुखापत जास्त गंभीर नसावी यासाठी दिल्ली कॅपिटल्स तसेच ऑस्ट्रेलियाचा संघ प्रार्थना करत असेल.

आगामी टी२० विश्वचषक आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर तत्काळ २ दिवसांच्या कालावधीत सुरू होणार आहे. हे सामने युएई आणि ओमानमध्ये खेळले जाणार आहेत.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही रिषभ पंतच्या नेतृत्वात चांगली सुरुवात केलेली आहे. संघाने दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना जिंकत त्यांच्या विजयाच्या अभियानामध्ये खंड पडू दिला नाही. हैदराबादविरुद्धचा सामना जिंकत संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचला आहे.

१३५ धावांच्या हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने पृथ्वी शाॅच्या रूपात पहिली विकेट गमावली. पण नंतर श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी चांगली भागीदारी साकारली. शिखरने ३७ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ४२ धावा केल्या तसेच अय्यरने नाबाद ४७ धावा केल्या, यामध्ये २ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्लीच्या पठ्ठ्याचे पहिल्याच सामन्यात सर्वात वेगवान ८ चेंडू; स्पीड पाहून तोंडून निघेल, तेज तर्रार..!

Video: पंत जिथे मनोरंजन तिथे! हवेत उडालेली रिषभची बॅट परत करताना विलियम्सनलाही आवरेना हसू

Video: विलियम्सनने पृथ्वी शॉचा घेतला भन्नाट कॅच, की गावसकरांना आठवला कपिल देवचा १९८३ वर्ल्डकपमधील झेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---