---Advertisement---

“फक्त आयपीएल नव्हे तर रिषभ टीम इंडियाचाही कर्णधार…,” भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या माजी कॅप्टनचा दावा

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 9:05 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या प्रगतीपथावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध त्याने केलेल्या जबरदस्त कामगिरीने त्याला प्रकाशझोतात आणले आहे. यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्त्वाची मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अशात माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना विश्वास आहे की पंत भविष्यात खूप पुढे जाईल.

आयपीएल २०२१ मध्ये पहिल्यांदाच दिल्ली संघाचे नेतृत्त्व करणारा पंत येत्या काळात भारतीय संघाच्या नेतृत्त्वपदी विराजमान होईल, असे अझरुद्दीन यांनी म्हटले आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत त्यांनी लिहिले आहे की, “पंतसाठी मागील काही महिने खूप विशेष राहिले आहेत. त्याने क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे येत्या काळात जर त्याला निवडकर्त्यांनी भारतीय कर्णधाराच्या शर्यतीत सर्वात पुढे ठेवल्यास ही आश्चर्याची बाब ठरणार नाही. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय संघ भविष्यात चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येणार आहे.”

 

रिषभ पंतने देशांतर्गत स्तरावर केलय नेतृत्त्व
भलेही पंतला यापुर्वी आयपीएलमध्ये नेतृत्त्व करण्याचा अनुभव नाही. मात्र त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीतील दिल्ली संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१७ साली दिल्ली संघ रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. अशात त्याच्या नेतृत्त्वाची कमाल आयपीएलमध्ये दिसेल का नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

SRHची चिंता वाढली; कोटींची किंमत मोजत खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूची आयपीएल २०२१ मधून माघार

आयपीएल २०२१: सामन्याचा नूर पालटू शकणारा प्रत्येक संघातील एक विदेशी खेळाडू

ऐकलत का! केवळ मुंबई नव्हे तर ‘या’ ठिकाणीही सुरू होणार बीसीसीआयचे नवीन कार्यालय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---