---Advertisement---

SRHची चिंता वाढली; कोटींची किंमत मोजत खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूची आयपीएल २०२१ मधून माघार

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 8:32 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा थरार येत्या काही दिवसातच रंगणार आहे. ९ एप्रिल पासून भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. अशातच गतवर्षी प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाला आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. संघातील महत्वाचा अष्टपैलू खेळाडू मिचले मार्श याने आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना काही बंधने घातली गेली आहेत. सर्व संघातील खेळाडूंना त्याचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श येत्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेत आहे. त्याला खूप काळ बायो बबलमध्ये राहायचं नाही. त्यामुळे त्याने हा धाडसी निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

गतवर्षी देखील तो आयपीएल स्पर्धेतून दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्यामुळे याचा फटका नक्कीच हैदराबाद संघाला बसू शकतो. हैदराबादने त्याला आयपीएल २०२० मध्ये २ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते.

आता मार्शच्या जागी हैदराबाद संघाने इंग्लंडचा धाकड क्रिकेटपटू जेसन रॉयला संघात सहभागी करण्यात आले आहे. हैदराबादने २ कोटींच्या किंमतीला त्याला विकत घेतले आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडच्या भारत दौऱ्यात चमकदार कामगिरी केली होती. जेसनच्या येण्याने हैदराबादची फलंदाजी फळी अजून जास्त मजबूत झाली आहे.

संघात डेविड वॉर्नर, केन विलियम्सन आणि जॉनी बेयरस्टोसारखे फलंदाज आधीपासूनच उपलब्ध आहेत. यात आता जेसनची भर पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१ पुर्वी सीएसकेला मोठा झटका, ‘या’ ३० वर्षीय गोलंदाजाने घेतली माघार

बापरे! एकाच सामन्यात 36 षटकार आणि 67 चौकारांची झाली बरसात; गोलंदाजांनी लावले डोक्याला हात

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोहली-डिव्हिलियर्स मध्ये चालू असलेल्या वादविवादात देवदत्त पडीक्कलची उडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---