---Advertisement---

आयपीएल २०२१ पुर्वी सीएसकेला मोठा झटका, ‘या’ ३० वर्षीय गोलंदाजाने घेतली माघार

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 7:10 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात हंगामातील पहिला सामना रंगणार आहे. तत्पुर्वी आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज गोलंदाज जोश हेजलवुड याने आयपीएल २०२१ मधून माघार घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाला पाहता ३० वर्षीय हेजलवुडने यंदाच्या आयपीएल हंगाम कालावधीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलताना हेजलवुडने सांगितले की, “मागील १० महिन्यांपासून मी वेगवेगळ्या वेळी जैव सुरक्षित वातावरण आणि विलगीकरणात राहिलो आहे. त्यामुळे मी क्रिकेटमधून थोडा वेळ सुट्टी घेण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन मी माझ्या मायदेशी आणि माझ्या घरी काही वेळ घालवू शकेन. पुढील हिवाळी हंगाम आमच्यासाठी खूप मोठा असणार आहे.”

“ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज दौरा खूप मोठा असेल. बांगलादेशविरुद्धची टी२० मालिका वर्षाच्या शेवटच्या महिन्यात होईल. त्यानंतर टी२० विश्वचषक २०२१ आणि मग ऍशेस सीरिज. अशाप्रकारे पुढील १२ महिने खूप महत्त्वाचे असणार आहेत. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असताना मला मानसिक आणि शारिरिक रित्या स्वत:ला पूर्णपणे तयार ठेवायचे आहे. याच कारणामुळे मी आयपीएलचा यंदाचा हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याचा पुढे मलाच फायदा होणार आहे,” असे त्याने पुढे सांगितले.

तसे तर, हेजलवुडच्या जाण्याने चेन्नई संघाला जास्त नुकसान झेलावे लागणार नाही. कारण ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हेजलवुड याची आयपीएल कारकिर्द जास्त विशेष राहिली नाही. गतवर्षी तो चेन्नई संघाचा भाग होता. मात्र पूर्ण हंगामात त्याला अवघ्या ३ सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली होती. दरम्यान त्याने ६४ धावा खर्च करत केवळ १ विकेट घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमध्ये यष्ट्यांमागे ‘सुपरमॅन’ असलेले ३ भारतीय विकेटकिपर

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोहली-डिव्हिलियर्स मध्ये चालू असलेल्या वादविवादात देवदत्त पडीक्कलची उडी

वनक्कम चेन्नई! मुंबई इंडियन्स चेन्नईत पोहचताच रोहितचे तमिळ भाषेत अभिवादन, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---