आयपीएलचे बिगुल वाजले असून ९ एप्रिपासून चेन्नईमध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होईल. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली असून या वेळी कोणते विक्रम नोंदविण्यात येणार किंवा कोणते विक्रम मोडले जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारतीय यष्टिरक्षक खेळाडूंनी या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये विकेटच्या मागे धोनीची जादू चांगली चालली आहे. यष्टिरक्षक म्हणून खेळताना सर्वाधिक बळी घेण्याच्या शर्यतीत दिनेश कार्तिक त्याला तगडी टक्कर देतोय. विशेष म्हणजे धोनीपेक्षा कार्तिकची आकडेवारी चांगली आहे.
एमएस धोनी
आयपीएलमध्ये विकेटच्या पाठीमागे थांबून जास्तीत जास्त बळी घेण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी अव्वल स्थानी आहे. धोनी हा जगातील दिग्गज यष्टिरक्षक आहे, त्याची शैली वेगळी आणि शानदार आहे. आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत एकूण २०४ सामने खेळले आहेत. त्याने १९७ डावात विकेटच्या मागे १४८ बळी घेतले आहेत. यात त्याने १०९ झेल घेतले तर ३९ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
दिनेश कार्तिक
कोलकाता नाइट रायडर्सचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक या यादीत दुसर्या स्थानावर आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून कार्तिक खेळत असून, आतापर्यंत तो ६ संघांसाठी खेळला आहे. कार्तिकने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत १९६ सामने खेळले आहेत. या सामन्यात १७९ डावात १४० बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याने ११० झेल आणि ३० यष्टीचीत केले आहेत.
रॉबिन उथप्पा
या यादीत रॉबिन उथप्पा तिसर्या क्रमांकावर आहे. रॉबिन उथप्पाने आयपीएल कारकीर्दीत आत्तापर्यंत एकूण १८९ सामने खेळले आहेत. त्याने ११४ डावांमध्ये एकूण ९० विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान उथप्पाने ५८ झेल पकडले तर ३२ यष्टीचीत केले आहेत. उथप्पाने मागील तीन हंगामापासून यष्टीरक्षण केले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना
आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे महागुरू झालेले ५ दिग्गज
एमएस धोनी ते रिषभ पंत! जाणून घ्या यंदाच्या आयपीएल मधील आठही संघांचे कर्णधार