---Advertisement---

DC vs PBKS | नाणेफेक जिंकत रिषभ पंतचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दिल्लीचा महत्त्वाचा खेळाडू संघातून बाहेर

On: बुधवार, एप्रिल 20, 2022 7:21 PM
DC-vs-PBKS
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा ३२वा सामना बुधवारी (दि. २० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ७वाजता या सामन्यातील नाणेफेक झाली. यादरम्यान दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात उभय संघ विजय मिळवत गुणतालिकेतील स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतील.

दिल्ली संघात मोठा बदल झाला आहे. संघातील महत्त्वाचा खेळाडू मिशेल मार्श कोरोनाग्रस्त झाल्याने तो संघातून बाहेर आहे. त्याच्या जाग्यावर सरफराज खानला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, संघाला विजय मिळवून देणारा ओडियन स्मिथ संघातून बाहेर झालाय. त्याच्या जागी नॅथन एलिसला ताफ्यात सामील केले आहे.

आमने- सामने कामगिरी
आतापर्यंत दिल्ली आणि पंजाब (Delhi Capitals vs Punjab Kings) संघात पंजाबच आघाडीवर आहे. पंजाबने दिल्लीविरुद्ध १५ सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे, दिल्ली संघाने १३ सामन्यात पंजाबला धूळ चारलीये. आता या सामन्यात कोण कुणाला पराभूत करतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, ललित यादव, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रहमान, खलील अहमद

पंजाब किंग्स- मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या- 

बिग ब्रेकिंग! दिल्लीचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, आज होणाऱ्या दिल्ली-पंजाब सामन्यावर प्रश्नचिन्ह

‘विराटने आता विश्रांती घ्यावी’, केवळ रवी शास्त्रीच नाही, तर ‘या’ दिग्गजाचाही सल्ला

विकेट गमावताच स्टॉयनिसची शिवीगाळ स्टंपमाईकमध्ये कैद, पाहा हेजलवुडच्या षटकात काय घडले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---