शनिवारी (13 मे) दिल्ली कॅपिटल्सला पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर दिल्लीचा संघ आयपीएल 2023च्या प्लऑफच्या (IPL Playoffs) शर्यतीतून बाहेर पडला आहे. प्लेऑफमधील चार जागांसाठी इतर 9 संघांमध्ये अजूनही स्पर्धा पाहायला मिळत आहे. आपण या लेखात याच नऊ संघांवर नजर टाकणार आहेत आणि त्यांचे प्लेऑफसाठीचे समिकरण जाणून घेणार आहोत.
गुजरात टाइटंस:
गुजरात टायटन्सने आतापर्यंत एकूण आठ सामने जिंकले आहेत. 16 गुणांसग गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. अशात प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळपास पक्के आहे. गुजरातला लीग स्टेजमध्ये अजून दोन सामने खेळायचे आहेत. अशात पुढच्या दोन सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला, तर गुजरातकडे एकूण 20 गुण होतील. तसेच या दोन सामन्यांमध्ये जर गुजरातला पराभव मिळाला, तरीही संघ चांगल्या रन रेटमुळे प्लऑफमध्ये जागा मिळवू शकतो. पुढच्या सामन्यात गुजरातपुढे सनरायझर्स हैदराबादचे लक्ष्य असेल.
चेन्नई सुपर किंग्स:
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर सिंग सध्या गुणातलिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेकडे एकूण 15 गुण आहेत. लीग स्टेजमध्ये धोनीच्या संघाला अजून कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामने खेळायचे आहेत. अजून एक सामना जिंकला, तरीही सीएसकेचे प्लेऑफचे तिकिट पक्के होईल. पण जर या दोन्ही सामन्यात सीएसकेला पराभव मिळाला, तर मात्र संघाचा पुढचा प्रवास खडतर असेल.
मुंबई इंडियंस:
रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत सात सामने जिंकले आहेत आणि 14 गुणांसह संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी मुंबईला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईला लीग स्टेजचे पुढचे दोन सामने लखनऊ आणि हैदराबाद संघाविरुद्ध खेळायचे आहेत. जर यापैकी एकच सामना मुंबईला जिंकता आला, तर इतर संघांसोबत नेट रन रेटच्या शर्यतीत मुंबईला वाजी मारावी लागेल.
लखनऊ सुपर जायंट्स:
लखनऊ संघ 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आ हे. लखनऊला मुंबई आणि कोलकाता संघाविरुद्ध पुढचे दोन सामने खेळायचे आहेत. प्लऑफमध्ये पोहोचण्यासाठी हे दोन्ही सामने लखनऊला जिंकावे लागतील. जर यापैकी एकच सामना लखनऊला जिंकता आला, तर संघ प्लेऑफसाठी इतर संघांच्या प्रदर्शानावर अवलंबून असेल.
राजस्थान रॉयल्स:
राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. असे असले तरी संघासाठी प्लेऑफचा मार्ग अजूनही मोकळा आहे. जर राजस्थानने आरसीबी आणि पंजाब किंग्जविरुद्धचे दोन्ही सामने राजस्थानने जिंकले, तर संघाकडे एकूण 16 गुण होतील. 16 गुणांसह देखील प्लेऑफमद्ये राजस्थान स्थान मिळवू शकतो.
पंजाब किंग्स:
शनिवारी (13 मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पंजाब किंग्जने विजय मळवला. हंगामातील हा त्यांचा सहावा विजय असून संघ 12 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. पंजाबला पुढचे सामि दिल्ली आणि राजस्थान संघांविरुद्ध खेळायचे आहेत. संघाने जर हे दोन्ही सामने जिंकले, तर 16 गुणांसह संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम असेल. पंजाबला आपल्या नेट रन रेटमध्येही सुधारणा करावी लागेल.
रॉयल चैलेंजर्स बैंगलोर:
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सध्या 10 गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. आरसीबीला अजून तीन सामने खेळायचे आहेत. राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघांविरुद्ध आरसीबी हे तीन सामने खेळेल. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हे तिन्ही सामने आरसीबीला जिंकावे लागतील. हे तिन्ही सामने जिंकल्यानंतर आसरीबीकडे 16 गुण होतील आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीत असेल. नेट रन रेट सुधारणे आरसीबीसाठी आवश्यक असणार आहे.
कोलकाता नाइटराइडर्स :
कोलकाता नाईट रायडर्स संघ 10 गुणांसह पॉइंट्स टेबलवर आठव्या क्रमांकावर आहे. संघाचा प्लेऑफपर्यंतचा प्रवास कठीण दिसत आहे. केकेआरला लखनऊ आणि सीएसकेविरुद्ध पुढचे दोन सामने खेळायचे आहेत. दोन्ही सामने जिंकल्यानंतर संघाकडे 14 गुण होतील. अशात 14 गुणांसह चौथ्या क्रमांकाचा संघ निवडला गेला, तर कुठेतरी केकेआरला संधी मिळू शकते.
सनराइजर्स हैदराबाद:
सनरायझर्स हैदराबाद संघ 8 गुणांसह 9व्या क्रमांकावर आहे. हैदराबादला अजून तीन सामने खेळायचे आहेत. यात गुजरात, आरसीबी आणि मुंबई संघांविरुद्धचे आव्हान हैदराबादपुढे असेल. संघाने जर पुढचे तीन सामने जिंकले, तर संघ कसाबसा 14 गुणांपर्यंत पोहोचेल. प्लेऑफमधील चौथा संघ 14 गुण असणारा निवडला गेला, तर हैदराबादलाही संधी मिळू शकते.
(Delhi Capitals out of playoff race! Find out what other teams have to do to make the playoffs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ होता मॅचचा टर्निंग पॉइंट! दिल्लीला हरवल्यानंतर शिखर धवनची खास प्रतिक्रिया
पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणंही चुकीचं! दक्षिण आफ्रिकी खेळाडूवर मोठी कारवाई