---Advertisement---

दिल्लीच्या संघाला विलगीकरणात जाण्याचे आदेश! कोलकाताचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

On: सोमवार, मे 3, 2021 10:38 PM
---Advertisement---

आयपीएल वरील कोरोनाचं संकट आता गंभीर रूप धारण करत आहे. कोलकाता संघातील दोन खेळाडू आजच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळवला जाणार असलेला आजचा सामना देखील रद्द करण्यात आला होता.
मात्र आता या गोष्टीचे पडसाद दूरगामी उमटण्याची संभावना आहे. कारण आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला देखील विलगीकरणात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण ४ दिवसांपूर्वीच दिल्लीने कोलकाता विरूद्ध सामना खेळला होता.

खबरदारी साठी घेतला निर्णय
दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना विलगीकरणात पाठवण्यामागे अन्य कुठलेही कारण नसून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे. बीसीसीआयने दिल्लीच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला तशा सूचना दिल्या असल्याचे वृत्त आहे. कारण २९ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळला होता. त्यानंतर आज कोलकाताचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. याच पार्श्वभूमीवर आता सावधानी बाळगली जात आहे.

मात्र दिल्लीच्या विलगीकरणाचा कालावधी अद्याप निश्चित झाला नाही आहे. परंतु ४ तारखेला दिल्लीच्या संघाचे नियोजित प्रॅक्टिस सेशन रद्द करण्यात येईल, अशीच शक्यता आहे. दिल्लीचा पुढील सामना देखील कोलकाताच्या संघाविरूद्धच होणार असून ८ मे रोजी हा सामना खेळवला जाणार आहे.

आयपीएलभोवती आवळला जातो आहे कोरोनाचा फास
आज सकाळीच कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. याबरोबरच चेन्नई सुपर किंग्ज संघातील ३ सदस्यही कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे निष्पन्न झाले होते. चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिशनच्या (डीडीसीए) ग्राउंड स्टाफमधील पाच कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

महत्वाच्या बातम्या:

आयपीएल स्पर्धा गाजवणारे हे ५ खेळाडू आगामी काळात करू शकतात भारतीय संघाकडून पदार्पण

पायातील बूट स्टंपला लागल्याने खेळाडू झाला अजबच पद्धतीने बाद, पाहा व्हिडिओ

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारतासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केला मदतीचा हात पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---