इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असलेले दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू रविवारी १२ सप्टेंबरला, इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी दुबईत दाखल झाले आहेत.
दुबईत आल्यावर कर्णधार रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि उमेश यादव यांच्यासह सर्व खेळाडूंची कोविडची चाचणी झाली.
दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘खेळाडूंना आयपीएल प्रोटोकॉलनुसार सहा दिवसांच्या क्वारंटाईनची आवश्यकता असेल, ज्या दरम्यान त्यांची तीन वेळा चाचणी केली जाईल. त्यानंतर, खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या उर्वरित संघात सामील होतील, जे आधीच या बायो-बबलचा भाग आहेत.’
The players, including Rishabh Pant, R Ashwin, Ajinkya Rahane, Ishant Sharma, Axar Patel, Prithvi Shaw & Umesh Yadav, underwent Covid-19 tests upon arrival in Dubai. #YehHaiNayiDilli #IPL2021 @SofitelDXBPalm [2/3] pic.twitter.com/oJNDFRg7Hz
— Delhi Capitals (@DelhiCapitals) September 12, 2021
आयपीएल २०२१ हंगाम पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्व फ्रँचायझींना सूचित केले आहे की, यूकेमधून येणाऱ्या सर्व खेळाडूंना त्यांच्या संघाच्या बायो बबलमध्ये सामील होण्यापूर्वी सहा दिवसांच्या विलगिकरणात ठेवणे बंधनकारक असेल.
अधिकारी म्हणाले, ‘बीसीसीआयने शुक्रवारी आम्हाला सूचित केले आहे की, यूकेमधून यूएईमध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला संघात सामील होण्यापूर्वी सहा दिवसांच्या विलगिकरणात ठेवणे आवश्यक आहे.’
The players will be serving a 6-day hard quarantine, as per IPL protocols, during which they will be tested thrice. Thereafter, the players will join the rest of the Delhi Capitals squad, who are already part of the bio-bubble.#YehHaiNayiDilli #IPL2021 @SofitelDXBPalm [3/3] pic.twitter.com/GFe9RsBofC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) September 12, 2021
मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम कसोटी रद्द झाल्यानंतर आयपीएल फ्रँचायझींनी शुक्रवारी(१० सप्टेंबर) चार्टर कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचे खेळाडू मँचेस्टरहून यूएईला आणले.
या वर्षी मे महिन्यात आयपीएलचा १४ वा हंगाम कोविड-१९ साथीमुळे मध्येच पुढे ढकलण्यात आला होता. १९ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स यांच्यात दुबईत सामना होईल.
तत्पूर्वी, इंग्लडच्या माजी खेळाडूंनी आयपीएलमुळे भारताने कसोटी मालिकेतील पाचवा सामना रद्द केला असे आरोप केले आहे. मात्र या आरोपाचे बीसीसीआयने खंडन केले आहे. भविष्यात ही कसोटी होण्यासाठी दोन्ही संघांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
यूके टू यूएई, आरसीबीचा कर्णधार कोहली अन् सिराज चार्टर्ड विमानाने युएईत दाखल; दिसले खास अंदाजात
तुफानी फलंदाजी! आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारे ६ क्रिकेटर; एकमेव भारतीयाचा समावेश
टी२० विश्वचषक जिंकणारे ३ कर्णधार, ज्यांना आयपीएलमध्ये एकदाही नाही मिळाली कॅप्टन्सी