---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या साहित्याचा लागला शोध,‌ लाखोंच्या बॅट गेलेल्या चोरीला, दिल्ली पोलिसांनी 48 तासात लावला छडा

---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मागील काही तास अत्यंत आनंदाचे ठरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करत त्यांनी हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. त्यानंतर आता संघासाठी दुसरी आनंदाची बातमी आली आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या खेळाडूंचे चोरीला गेलेले क्रिकेटचे साहित्य मिळाले असून, कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने ही माहिती दिली. ‌ दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत या प्रकरणाचा छडा लावला.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1649354897954082822?t=8virMlm36SVaR7f-90B9DA&s=19

 

दिल्ली कॅपिटलच्या खेळाडूंचे साहित्य 19 एप्रिलला दिल्ली येथील हॉटेलमधून चोरीला गेले होते. कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) याच्या 3, मिचेल मार्शच्या 2, यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्ट याच्या 3 आणि यश धुल (Yash Dhull) याच्या 5 बॅटचा यात समावेश होता. मार्श आणि वॉर्नरच्या बॅटची किंमत प्रत्येकी1 लाख रुपये होती. याव्यतिरिक्त इतर खेळाडूंच्या बॅगमधून बूट, ग्लोव्ह्ज आणि क्रिकेटच्या इतर काही गोष्टीही चोरीला गेलेल्या.

ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर खेळाडूंनी दिल्ली कॅपिटल फ्रेंचायजीला याबाबत कल्पना दिली. फ्रॅंचायजींनी पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल केलेली. त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये पोलिसांनी हे साहित्य पुन्हा मिळवले.

डेव्हिड वॉर्नर याने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत याबाबत माहिती दिली.‌ ‘पोलिसांनी साहित्य मिळवून दिले. सर्व साहित्य मिळाले नसले तरी, आनंदी आहोत.’ अशा आशयाची स्टोरी त्याने सार्वजनिक केलेली.

या सर्व घडामोडी दरम्यान दिल्लीने केकेआरविरुद्ध हंगामातील पहिला विजय मिळवला. सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत केकेआरच्या फलंदाजांना 127 धावांवर रोखले होते. त्यानंतर स्वतः वॉर्नर याने संघर्षपूर्ण अर्धशतक झळकावले. सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला तरी दिल्लीने संयम दाखवत विजय संपादन केला.

Delhi Capitals’ Players Get Back Stolen Bats And Other Equipment, Confirms Skipper David Warner

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा मोठा निर्णय! Asian Gamesमध्ये भारतीय संघ पाठवण्यास दिला थेट नकार, कारण घ्या जाणून
पाच पराभवांनी गांगुलीची हवा झालेली टाईट, दिल्लीने विजय मिळवताच म्हणाला, ‘माझी पहिल्या कसोटीतील धाव…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---