---Advertisement---

मूर्ती लहान कीर्ती महान!! अवघ्या १२५ चेंडूंमध्ये १३ वर्षीय फलंदाजाने चोपल्या ३३१ धावा

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 2:39 PM
---Advertisement---

दिल्लीचा १३ वर्षीय क्रिकेटपटू सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकॅडमीचा युवा क्रिकेटपटू मोहक कुमार याने शिक्षा भारती क्रिकेट स्टेडियमवर तुफानी खेळी केली आहे. त्याने ड्रीम चेंजर्स चषक स्पर्धेत,१३ वर्षाखालील वयोगटात १२५ चेंडूमध्ये २६४.८० च्या सरासरीने ३३१ धावांची खेळी केली.

मोहक कुमार दिल्ली कॅपिटल्स बालभवन क्रिकेट अकॅडमीसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. या संघातील सलामीवीर फलंदाज अवघ्या ५ धावांवर माघारी परतले होते. त्यावेळी मोहक कुमारने मोर्चा सांभाळला आणि डाव पुढे नेला. त्याने या तुफानी खेळी दरम्यान २८ चौकार आणि ३० षटकार मारले.या १३ वर्षीय फलंदाजाने १३७ मिनिट फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा घाम काढला.

या तुफानी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स बालभवन क्रिकेट अकॅडमीला ४० षटकात ७ बाद ५७६ धावा करण्यात यश आले. यामध्ये मोहक कुमारच्या तुफानी खेळीसह शिवाई मलिकने ६७ आणि आर्यन भारद्वाजने ४० धावांचे योगदान दिले.

या बलाढ्य धावांचा पाठलाग करताना एंड्योरेंस क्रिकेटर अकॅडमीचा संपूर्ण डाव अवघ्या १७.१ षटकात १५३ धावांवर संपुष्टात आला होता. एंड्योरेंस क्रिकेटर अकॅडमी संघाकडून मेधांशने सर्वाधिक धावा केल्या. त्याने अवघ्या ५३ चेंडूंमध्ये १२६ धावांची खेळी केली.

दिल्ली कॅपिटल्स बालभवन क्रिकेट अकॅडमीसाठी वामन आणि यतीन सोलंकी हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. वामनने २९ धावा खर्च करत ५ तर यतीनने ४५ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकादमीने हा सामना १७८ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

“ही तर सुरुवात आहे मित्रा, तुझा अभिमान वाटतो”, श्रेयस अय्यरला दिग्गज कर्णधार पाँटिंगकडून मिळाल्या शुभेच्छा

“राहुल द्रविड टीम इंडियात आणेल स्थैर्य”, दिग्गज भारतीय क्रिकेटरला विश्वास

पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांना युएईमध्ये जाहीर झाला मोठा क्रीडा पुरस्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---