---Advertisement---

आरसीबीविरूद्ध दिल्लीला भासणार ‘या’ खेळाडूची कमतरता

On: मंगळवार, एप्रिल 27, 2021 4:48 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये मंगळवारी (२७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आमने सामने येतील. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. गुणतालिकेत दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर असलेल्या संघांमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची उणीव भासेल. कोरोना आजाराची परिस्थिती गंभीर होत असल्या कारणाने अश्विनने उर्वरित आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

म्हणून भासणार अश्विनची कमी
रविचंद्रन अश्विन हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी फिरकीपटूंपैकी एक आहे. अश्विन एक बुद्धिमान क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. आपल्या गोलंदाजीने तो विरोधी संघाच्या फलंदाजांवर कुरघोडी करताना दिसतो. कगिसो रबाडा व ख्रिस वोक्स यांच्यासह तो पावर प्लेमध्ये कर्णधार रिषभ पंतसाठी फायदेशीर ठरू शकतो. परंतु, अश्विन पहिल्या ५ सामन्यांमध्ये चांगल्या लयीत दिसला नव्हता. त्याला केवळ एक बळी मिळविण्यात यश आले होते.

ललित यादवला मिळू शकते संधी
अश्विनने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात अष्टपैलू ललित यादवला संधी देऊ शकते. ललित एक उत्कृष्ट अष्टपैलू आहे. तो आक्रमक फलंदाजीसोबत ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजय करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. ललित एक शानदार क्षेत्ररक्षक देखील आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार सामना
आजचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली गेली होती. दिल्लीला येथे ४ सामने खेळले जाणार आहेत. अश्विन संघाचा भाग असतात तर, अनुभवाचा फायदा संघालाही झाला असता. हे तेच मैदान आहे जिथे दिल्लीचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये १५ गडी बाद केले होते. त्याचबरोबर अश्विनने या मालिकेत ४ सामन्यांत ३२ बळी घेतलेले.

महत्वाच्या बातम्या:

येस बॉय, पृथ्वी शॉची धमाकेदार खेळी पाहून गर्लफ्रेंड अति आनंदित; केलं तोंडभरुन कौतुक

कोरोना लसीकरणाबाबत बीसीसीआयची दुटप्पी भूमिका, भारतीयांना लस देणार तर परदेशी खेळाडू

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनंतर आता न्यूझीलंडच्या खेळाडूंविषयी आले महत्त्वाचे अपडेट, उर्वरित आयपीएल हंगामाबाबत घेतला हा निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---