बुधवारी (२० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर ९ विकेट्सने विजय मिळवला आहे. आयपीएल २०२२मधील या ३२व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ ११५ धावांवरच गारद झाला. प्रत्युत्तरात दिल्लीकडून सलामीवीर डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी धमाकेदार खेळी करत संघाला १०.३ षटकांमध्येच सामना जिंकून दिला. हा विजय दिल्ली संघासाठी अतिशय खास होता. त्यातही सामना विजयानंतर वॉर्नरने आपल्या संघ सहकाऱ्यांचा उत्साह आणखीनच वाढवला आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीच्या ताफ्यात (Covid Scare In Delhi Capitals) कोरोनाचा विस्फोट झाला होता. त्यांचे फिजिओ टीम सिफर्ट आणि नंतर खेळाडू मिचेल मार्श हे कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे दिल्लीच्या ताफ्यात भीतीचे वातावरण पसरले होते. सातत्याने त्यांच्या कोविड चाचण्या केल्या जात होत्या. खेळाडूही सेल्फ आयसोलेशनमध्ये होते. त्यामुळे सराव सत्राविनाच दिल्लीचे खेळाडू पंजाबविरुद्ध (DC vs PBKS) मैदानात उतरले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अशा परिस्थितही दिल्ली संघातील खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला. सुरुवातीला गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत पंजाबला ११५ धावांवरच रोखले. त्यानंतर वॉर्नर (David Warner) आणि शॉने झटपट खेळी करत ५७ चेंडू शिल्लक असताना संघाला सामना जिंकून दिला.
यानंतर ड्रेसिंग रूमचेही वातावरण शानदार बनवण्यात वॉर्नरने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. सामन्यानंतर वॉर्नरने ड्रेसिंग रूममध्ये आपले बॉलिवूड प्रेम दाखवत ‘उरी’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हटला. त्याने सर्वांना ‘हाव इज द जोश (How’s The Josh)‘, असे विचारत सर्वांमधील उत्साह द्विगुणित केला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनीही त्याच्या सूरात सूर मिसळत ‘हाय सर‘ म्हणत त्याला प्रतिसाद दिला. दिल्ली संघाने ट्वीटरवर या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
𝐉𝐎𝐒𝐇 = 𝐀𝐋𝐖𝐀𝐘𝐒 𝐇𝐈𝐆𝐇 🔥#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvPBKS | #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/K4rGqtaIkP
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 20, 2022
डेविड वॉर्नर दिल्लीसाठी ठरतोय मॅच विनर
दरम्यान वॉर्नर आयपीएलच्या चालू हंगामात दिल्लीकडून जबरदस्त प्रदर्शन करत आहे. त्याने आतापर्यंत दिल्लीकडून ४ सामने खेळताना १९१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १५२.८० च्या स्ट्राईक रेटने धावा निघाल्या आहेत. तसेच त्याने लागोपाठ ३ अर्धशतकेही केली आहेत.
दुसरीकडे दिल्लीचा हा हंगामातील तिसरा विजय होता. त्यांनी आतापर्यंत ६ सामने खेळताना ३ सामने जिंकले आहेत, तर ३ सामने गमावले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा मैदानात घोंगावलं होतं पोलार्ड नावाचं वादळ, श्रीलंकेविरुद्ध एकाच षटकात ठोकले होते सलग ६ षटकार
चेन्नईच्या सलामीवीराने लग्नासाठी सोडला बायोबबल, जाणून घ्या कधी होणार पुनरागमन
मोठी बातमी! चेन्नई संघात नव्या भिडूची एन्ट्री, ‘हा’ १९ वर्षीय खेळाडू घेणार ऍडम मिल्नेची जागा