बुधवारी (२० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२२चा ३२वा सामना खेळला गेला. हा सामना खेळवला जाण्यावर शंका होती. कारण या सामन्यापूर्वी दिल्ली संघात कोविड-१९ चा उद्रेक झाला होता. परंतु अखेर मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला आणि दिल्लीने शानदार प्रदर्शन करत ९ विकेट्स राखून हा सामनाही जिंकला. या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल यानेही काही खेळाडूंवर पराभवाचे खापर फोडले आहे.
दिल्ली संघाचे फिजिओ टीम सिफर्टचा कोविड-१९ अहवाल (Covid Scare In Delhi Capitals) पॉझिटिव्ह आढळला होता, ज्यामुळे सामना आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याविषयी बोलताना पंत (Rishabh Pant) म्हणाला की, “कोविडमुळे बऱ्याच शंका उपस्थित झाल्या होत्या. आम्हीही थोडे घाबरलो होतो. कारण अशी चर्चा होत होती की, हा सामना रद्द केला जाऊ शकतो. परंतु आम्ही संघ म्हणून चर्चा केली आणि फक्त सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
रिषभ पंतने खेळाडूंचे केले कौतुक
दिल्लीकडून (Delhi Capitals) त्यांच्या फिरकीपटूंनी आणि सलामी जोडी डेविड वॉर्नर व पृथ्वी शॉ यांनी शानदार प्रदर्शन केले. खेळाडूंच्या प्रदर्शनाची स्तुती करताना कर्णधार पंत म्हणाला की, “मी नेहमी शॉ आणि वॉर्नरला खेळण्याचे स्वातंत्र्य देत असतो. कारण त्यांना त्यांच्या भूमिका माहिती आहेत. तसेच ब्रेबॉर्नच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना जास्त मदत मिळत होती. याचा फायदा घेत आमच्या तिन्ही फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली. तसेच कुलदीप यादवला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर निवडले गेले. परंतु मला वाटते की, त्याने अक्षर पटेलसोबत हा पुरस्कार वाटून घेतला पाहिजे, कारण त्याने मधल्या षटकात संघाला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या होत्या.”
मयंक अगरवालने सांगितली संघातील उणीव
पंजाबचा कर्णधार (Punjab Kings) मयंक अगरवालने (Mayank Agarwal) त्यांच्या खराब फलंदाजी आणि खराब गोलंदाजी प्रदर्शनाला पराभवास जबाबदार धरले आहे. मयंक म्हणाला की, “आम्ही ना चांगली गोलंदाजी केली ना चांगली फलंदाजी. आम्हाला या प्रदर्शनाचा विसर पाडावा लागेल. आम्ही सुरुवातीलाच खूप विकेट्स गमावल्या. मला याबद्दल जास्त बोलायचे नाहीय. आम्ही कमीत कमी १८० धावा करायला पाहिजे होत्या. परंतु आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाहीत.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाँटिंगचा ‘हा’ गुरुमंत्र आला कामी, दिल्लीने पंजाबला केलं चारीमुंड्या चीत
आयपीएल इतिहासात ‘ही’ अवघड कामगिरी करणारा दिल्ली पहिलाच संघ, पंजाबविरुद्ध केलाय पराक्रम
मुंबई इंडियन्सचे खेळाडू मधमाशांसमोर हतबल, सरावादरम्यान झोपावं लागलं मैदानात, Video व्हायरल