Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्ली संघात कोरोनाचा फैलाव होण्यास डॉक्टर कारणीभूत? ‘या’ कारणाने निर्माण झाले प्रश्न

दिल्ली संघात कोरोनाचा फैलाव होण्यास डॉक्टर कारणीभूत? 'या' कारणाने निर्माण झाले प्रश्न

April 21, 2022
in Covid19, IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Delhi-Capitals

Photo Courtesy: iplt20.com


मुंबई। बुधवारी (२० एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दिल्लीने ९ विकेट्स आणि ५७ चेंडू राखून मोठा विजय मिळवला. मात्र, या सामन्याच्या आयोजनाबाबत अनिश्चितता होती. कारण, या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून कोरोना पॉझिटिव्हचे सहावे प्रकरण समोर आले होते. मात्र, सामन्यापूर्वी संघातील अन्य सदस्यांच्या दोन कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर सामना नियोजित वेळेप्रमाणे पूर्ण झाला. 

दरम्यान, हा सामना यापूर्वी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता. पण, दिल्ली संघात (Delhi Capitals) कोरोनाची प्रकरणे (Covid-19 Cases) समोर आल्यानंतर संघाचा पुण्याला जाण्याचा बेत रद्द करून मुंबईतच थांबण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच खेळाडूही क्वारंटाईन होते. तसेच सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयोजित करण्यात आला.

पण, आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, बायोबबलमध्ये अचानक कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला कसा? यासाठी आता दिल्ली संघाचे डॉक्टर अभिजीत साळवी (Abhijit Salvi) यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशी चर्चा होत आहे की, अभिजीत साळवी यांच्या ‘इस्टर डिनर’ दरम्यान बायो-बबलचे उल्लंघन झाले. तरी अद्याप ही केवळ शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच असाही प्रश्न निर्माण होत आहे की, संघाचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही खेळाडू इस्टर सेलिब्रेशनमध्ये कसे सामील होते. तसेच साळवी यांनी कठोर नियम का सुनिश्चित केले नव्हते, असाही प्रश्न उठवला जात आहे. यापूर्वी गेल्यावर्षी जेव्हा श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघातील काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले होते, तेव्हा अभिजीत साळवी हेच संघाचे डॉक्टर होते.

दिल्लीचे हे सदस्य कोविड पॉझिटिव्ह 
पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीचा परदेशी खेळाडू टीम सिफर्ट हा कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्याआधी दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श याचा कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आलेली असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तसेच दिल्लीचे अन्य काही सदस्यही कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट, स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, टीम डॉक्टर अभिजीत साळवी आणि सोशल मीडिया सदस्य आकाश माने यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

दिल्लीच्या पुढील सामन्याचेही ठिकाण बदलले
दिल्ली कॅपिटल्स संघाला २२ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता. पण, दिल्ली संघ मुंबईतच असल्याने हा सामना आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

जिंकलस भावा! कुलदीपने सामनावीर पुरस्कार केला अक्षर पटेलबरोबर शेअर, कारणही सांगितलं

एवढे मोठे क्रिकेटर असलेले कपिल देव ‘या’ व्यक्तीला घाबरुन कुठे-ना-कुठे लपण्यासाठी जागा शोधायचे

पावरप्लेमधील धमाक्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा खास विक्रम, गुणतालिकेतही घेतली भरारी


ADVERTISEMENT
Next Post
Mumbai-Indians

मुंबई इंडियन्सचे खेळाडू मधमाशांसमोर हतबल, सरावादरम्यान झोपावं लागलं मैदानात, Video व्हायरल

David-Warner-Sarfaraz-Khan

आयपीएल इतिहासात 'ही' अवघड कामगिरी करणारा दिल्ली पहिलाच संघ, पंजाबविरुद्ध केलाय पराक्रम

Ricky-Ponting

पाँटिंगचा 'हा' गुरुमंत्र आला कामी, दिल्लीने पंजाबला केलं चारीमुंड्या चीत

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.