---Advertisement---

मुंबई इंडियन्सचे खेळाडू मधमाशांसमोर हतबल, सरावादरम्यान झोपावं लागलं मैदानात, Video व्हायरल

Mumbai-Indians
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात गुरुवारी (२१ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या सरावादरम्यान मोठा अडथळा आला होता. हा अथडळा पाऊस-वारा यांमुळे नाही, तर चक्क मधमाशांमुळे आला होता. 

झाले असे की, मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians) जेव्हा मैदानात सराव करत होता, तेव्हा मधमाशांचा समुहाने अचानक प्रवेश केला. त्यांचा हल्ला  पाहून मुंबईचे सराव सत्र काही काळासाठी थांबवण्यात आले. तसेच खेळाडूही मैदानावर पालथे झोपले. तरी या मधमाशांच्या हल्ल्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. या घटनेचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.

तसेच क्रिकेटमध्ये मधमाशांमुळे अडथळा येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा सामना सुरू असताना असा मधमाशांचा हल्ला झाला आहे. त्यावेळीही काही काळ सामने थांबवण्यात आले होते. (Bee Attack on Mumbai Indians Training Session)

मुंबई इंडियन्सला विजयाची प्रतिक्षा
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ जरी असला तरी आयपीएलच्या १५ हंगामात संघाला फारशी कमाल दाखवता आलेली नाही. मुंबईने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ हंगामात ६ सामने खेळले असून सर्व ६ सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. आता सातवा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाची देखील आयपीएलच्या १५ व्या हंगामात खास कामगिरी झालेली नाही. त्यांनीही ६ पैकी ५ सामने गमावले आहेत. अशात त्यांनाही चेन्नई देखील त्यांचा सातवा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघ (MI vs CSK) सध्या विजयासाठी संघर्ष करत असल्याने दोनीह संघांसाठी गुरुवारचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात विजयाचा प्रयत्न करून आपले आव्हान टिकवून ठेवण्याचाही प्रयत्न करताना दिसतील.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

दिल्ली संघात कोरोनाचा फैलाव होण्यास डॉक्टर कारणीभूत? ‘या’ कारणाने निर्माण झाले प्रश्न

जिंकलस भावा! कुलदीपने सामनावीर पुरस्कार केला अक्षर पटेलबरोबर शेअर, कारणही सांगितलं

एवढे मोठे क्रिकेटर असलेले कपिल देव ‘या’ व्यक्तीला घाबरुन कुठे-ना-कुठे लपण्यासाठी जागा शोधायचे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---