---Advertisement---

DC vs GT | नाणेफेकीचा कौल रिषभच्या खात्यात, एका बदलासह असे आहेत दिल्ली आणि गुजरातचे संघ

On: शनिवार, एप्रिल 2, 2022 7:23 PM
Rishabh-Pant-Hardik-Pandya
---Advertisement---

शनिवारी (०२ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधील दुसरी डबल हेडर खेळवली गेली. यातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार असून हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता या सामन्यासाठी नाणेफेक झाली आहे. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

गुजरातने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीच्या संघात केवळ एक बदल आहे. दिल्लीकडून युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीला बाहेर कर मुस्तफिजूर रेहमानला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे.

असे आहेत दोन्ही संघ-

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, टीम सेफर्ट, मनदीप सिंग, रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), ललित यादव, रोवमन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रेहमान

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर सदारंगनी, राशीद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन, मोहम्मद शमी

महत्त्वाच्या बातम्या-

काटा किर्रर्र..! बटलरचे मुंबईविरुद्ध अविस्मरणीय शतक, पण बुमराहने दिली तितकीच वेदनादायी जखम

सेफ हँड्स! पडीक्कलचा झेल रोहितसाठी ठरला विक्रमी, पूर्ण केले ट्वेंटी ट्वेंटीमधील ‘दीडशतक’

IPL2022 | जोस बटलर ठरला आयपीएलच्या १५व्या हंगामात शतक झळकावणारा पहिला फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---