---Advertisement---

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत अनुभवी अमित मिश्रा बजावणार ‘ही’ मोठी भूमिका

---Advertisement---

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच संघातील खेळाडूंनी बायो बबलमध्ये येऊन आपापल्या संघासोबत सराव करायला सुरुवात केली आहे. यंदा श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे रिषभ पंतच्या हाती देण्यात आली आहेत. तसेच संघातील सर्वात अनुभवी खेळाडू अमित मिश्रा हा देखील येणाऱ्या हंगामात नवीन भूमिकेसह मैदानात उतरू शकतो.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला वनडे मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. यासोबतच तो आयपीएल मधून देखील बाहेर झाला आहे. त्यामुळे दिल्लीचे नेतृत्त्व यंदा रिषभ पंतच्या हाती देण्यात आले आहे. तसेच श्रेयस अय्यर संघात नसल्याने दिल्ली संघाला फलंदाजीमध्ये कमतरता जाणवू शकते. यामुळे अमित मिश्रा देखील फलंदाजीचा कसून सराव करताना दिसून येत आहे. त्याने एक मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.

अमित मिश्रा मैदानात गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही घाम गाळताना दिसून येत आहे. त्याने बुधवारी (३१ मार्च) दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “सराव शिबिरात सहभागी होणारे युवा खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. युवा खेळाडूंना अशाप्रकारे मेहनत घेताना पाहणे स्वतःसाठी खूप प्रेरणा देणारे आहे. मी या हंगामात माझ्या गोलंदाजीसह फलंदाजीवरही प्रचंड मेहनत घेत आहे. प्रशिक्षकांनी मला फलंदाजीचा सराव करण्यास सांगितले आहे. कारण संघाला आवश्यकता असेल तर मी येईन २५-३० धावा करू शकतो.”

संघाच्या रणनिती बद्दल बोलताना अमित मिश्रा म्हणाला

“आम्ही यंदा कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी करत आहोत.जर अशी परिस्थिती उद्भवली जिथे मला जाऊन २५-३० धावा करण्याची आवश्यकता भासली तर ते करण्यासाठी मला तयार असायला हवे.तसेच जर मी कुठल्या फलंदाजांसोबत फलंदाजी करत असेल तर,मला भागीदारी पुढे घेऊन जाण्यासाठी स्ट्राइक रोटेट करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे,” असे शेवटी अमित मिश्रा म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

युवा शिलेदार सज्ज, सीनियरच्या निवृत्तीनंतर फरक पडणार नाही; ३४० विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचे मत 

‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्यात परदेशी खेळाडूंचा बोलबाला; रोहित-धोनी आहेत ‘या’ क्रमांकावर

वनडे क्रमवारीत भारतीयांचा बोलबाला, भूवीची ९ स्थानांनी उडी; तर हार्दिक कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---