भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तो मालिकेतून बाहेर झाला होता. तसेच दुखापत गंभीर असल्यामुळे तो आयपीएल २०२१ मधून देखील बाहेर झाला आहे. यानंतर प्रश्न उपस्थित झाला आहे की, श्रेयस आयपीएलमधून झाला आहे तर त्याला मानधन मिळणार का?
आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सूत्र सांभाळत श्रेयसने संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु यंदा तो दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे रिषभ पंतला दिल्लीचे कर्णधारपद देण्यात आले आहे. श्रेयस जरी आयपीएलमधून बाहेर झाला असला; तरी देखील त्याला दिल्ली संघाकडून ‘खेळाडू विमा योजने’ अंतर्गत ७ कोटी रुपये मिळणार आहेत.
पंतकडे दिल्ली संघाचे सूत्र
इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर गंभीर दुखापत झाल्यानंतर श्रेयसला मैदानाबाहेर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यामुळे दिल्ली संघासमोर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला होता की, श्रेयसच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी कोण पार पाडणार?.
या पदासाठी दिल्ली संघात अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ आणि आर अश्विन सारखे दिग्गज खेळाडू असताना देखील, दिल्ली संघाने रिषभ पंतवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की तो ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतो?
महत्त्वाच्या बातम्या-
डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर यष्टीरक्षकाने चपळाईने केली फलंदाजाची बत्ती गुल, बघा भन्नाट व्हिडिओ
का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?