---Advertisement---

इथे सुट्टी नाही! मैदानात उतरताच नवीनला प्रेक्षकांनी घेतले फैलावर, लागले कोहली..कोहलीचे नारे

On: बुधवार, ऑक्टोबर 11, 2023 5:01 PM
---Advertisement---

बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 9वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जात आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघ फलंदाजी करत आहे. असे असताना सामना सुरू होण्याआधी ज्यावेळी अफगाणिस्तान संघ सरावासाठी मैदानात उतरला तेव्हा अफगाणिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याला भारतीय प्रेक्षकांनी चांगलेच ट्रोल केले.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याआधी अफगाणिस्तान संघ आपले अखेरचे सराव सत्र पार पाडत होता. त्यावेळी मैदानात प्रवेश करण्यास सुरुवात केलेल्या त्या चाहत्यांनी अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हक याला पाहून कोहली कोहली असे ओरडण्यास सुरुवात केली. यापूर्वी झालेल्या धर्मशाला येथील अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यातही चाहत्यांनी त्याच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.

नवीन यावर्षी झालेल्या आयपीएलपासून भारतीय चाहत्यांच्या चांगलाच निशाण्यावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स या सामन्यात विराट व नवीन यांच्या दरम्यान वाद झाला. त्यानंतर नवीन याने सोशल मीडियावर अशा काही पोस्ट केल्या होत्या, ज्यामुळे भारतीय प्रेक्षक चांगलेच खवळलेले. याच कारणामुळे भारतीय चाहते त्याला वारंवार ट्रोल करतात.

केवळ 23 वर्षांचा असलेला नवीन या विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. यानंतर तो केवळ टी20 क्रिकेट खेळताना दिसेल.

(Delhi Crowd Troll Naveen Ul Haq Ahead India Afghanistan Match)

हेही वाचा-
रिझवानचा भीमपराक्रम! श्रीलंकेविरुद्धच्या तडाखेबंद शतकामुळे केला ‘हा’ विक्रम, 18 वर्षे जुना Record उद्ध्वस्त
दिल्लीत टीम इंडियापुढे अफगाणी आव्हान, पाहुण्यांनी जिंकला टॉस; रोहितसेनेतून स्टार खेळाडू बाहेर- Playing XI

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---